आणखी दोन इमारतींवर हातोडा

By Admin | Updated: December 9, 2014 01:00 IST2014-12-09T00:56:43+5:302014-12-09T01:00:45+5:30

औरंगाबाद : साताऱ्यामधील अनधिकृत बांधकामांवर नगर परिषदेने हातोड्याचे घाव घालणे सुरूच ठेवले आहे. प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर येऊन बिल्डरांनी रास्ता रोको आंदोलन केले

Hammer on two more buildings | आणखी दोन इमारतींवर हातोडा

आणखी दोन इमारतींवर हातोडा


औरंगाबाद : साताऱ्यामधील अनधिकृत बांधकामांवर नगर परिषदेने हातोड्याचे घाव घालणे सुरूच ठेवले आहे. प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर येऊन बिल्डरांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे सोमवारी कारवाईसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवून आय्यपा स्वामी मंदिर रस्त्यावरील दोन इमारतींवरील प्रत्येकी दोन अनधिकृत मजले पाडण्यात आले.
दुपारी साताऱ्यातील आय्यपा स्वामी मंदिर रस्त्यावर अतिक्रमण हटाव पथक, मशिनरी, पोलीस फौजफाटा, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. यावेळी गट क्रमांक १४१ येथील यशराज आर्केडच्या व १४२ मधील जान्हवी डेव्हलपर्सच्या पाच मजली इमारतींच्या प्रत्येकी दोन अनधिकृत मजल्यांवर हातोडा चालविण्यात आला. विनापरवानगी ज्यांनी बांधकामे केली, अशा ३१४ बांधकामांना आतापर्यंत नोटिसा जारी केल्या आहेत. सोमवारीही काहींना नोटिसा जारी करण्यात आल्या.
यशराज आर्के डच्या पाच मजली इमारतींमधील २० फ्लॅटपैकी जवळपास १७ फ्लॅटची बुकिंग करण्यात आली असून जवळपास ८० टक्के रक्कम फ्लॅट घेणाऱ्यांनी जमा केली आहे; परंतु कारवाईमुळे १० फ्लॅट तोडण्यात आले. इमारत स्वत: पाडणार असल्याचे शपथपत्र देण्याची तयारी दर्शविल्यानंतरही थेट पाडापाडीची कारवाई करण्यात आली. त्यामुळे बांधकाम साहित्याच्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे विठ्ठल पांपटवार म्हणाले. २० दिवसांपूर्वी नोटिसा देऊनही बांधकाम पाडण्यात आले नाही, त्यामुळे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आल्याची माहिती सीईओ अशोक कायंदे यांनी दिली.
सुरक्षेकडे दुर्लक्ष
बांधकाम पाडत असताना कोणी मध्येच येणार नाही, याची दक्षता घेण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र कारवाईदरम्यान दिसून आले. शाळकरी मुले, ज्येष्ठ, वाहन अचानक येत असल्याने ‘अरे थांब’ असा आवाज दिला जात होता. पाडापाडीदरम्यान विद्युत तारांवर बांधकाम साहित्य पडत असल्यानेही ठिणग्या उडण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येते.
१२ इमारतींवर कारवाई
अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केल्यानंतर आतापर्यंत १० इमारतींवर कारवाई करण्यात आली होती, तर सोमवारी सायंकाळपर्यंत दोन इमारतींचे अवैध मजले पाडण्यात आल्याने हा आकडा १२ झाला आहे. इमारतीच्या अवैध मजल्यावरील काही भागांतील बांधकाम कारवाईत पथकाकडून पाडले जात आहे. उर्वरित बांधकाम संबंधित बिल्डरकडून पाडले जाणार आहे.४
बांधकाम पाडण्याची कारवाई पाहणाऱ्या अनेकांना आपले अश्रू आवरत नव्हते. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींवर आज कारवाई सुरू आहे. उद्या आपण ज्या ठिकाणी राहतो, तिथे कारवाई झाल्यास काय होईल, अशी चिंता अनेकांना सतावत आहे. कारवाईबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून बांधकामे पूर्ण होईपर्यंत प्रशासन काय करीत होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.४
सातारा-देवळाई नगर परिषदेने अवैध बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू केली. त्यापूर्वी न.प.ने अवैध बांधकामांना नोटिसा बजावल्या होत्या.
४ नगर परिषदेच्या कारवाईच्या विरोधात काहींनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्या आहेत, त्यामुळे यामध्ये १८ बांधकामांबाबत ‘जैसे थे’ आदेश असल्याचे सीईओ अशोक कायंदे यांनी सांगितले.४
बीड बायपासवरील आय्यप्पा स्वामी मंदिराच्या कमानीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या नाल्याच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यात आला आहे.
४सोमवारी हा नाला मोकळा करण्याचे कामही हाती घेण्यात आले असून, नाल्याचा मार्ग बंद करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Hammer on two more buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.