साताऱ्यात दोन बिल्डिंगवर हातोडा

By Admin | Updated: December 11, 2014 00:46 IST2014-12-11T00:11:31+5:302014-12-11T00:46:27+5:30

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात बुधवारीही बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम चालूच राहिली. नगर परिषदेच्या वतीने गट नं. ११८ मध्ये कारवाई करीत पथकाने दोन अतिरिक्त बांधकामांवर हातोड्याचे घाव घातले.

Hammer on two buildings in Satara | साताऱ्यात दोन बिल्डिंगवर हातोडा

साताऱ्यात दोन बिल्डिंगवर हातोडा

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरात बुधवारीही बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम चालूच राहिली. नगर परिषदेच्या वतीने गट नं. ११८ मध्ये कारवाई करीत पथकाने दोन अतिरिक्त बांधकामांवर हातोड्याचे घाव घातले. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराचे बांधकाम असल्याच्या कथित मुद्यावरून कारवाई करताना काही वेळ संघर्षही उडाला.
अतिक्रमण हटाव पथकाचे सहकार्य घेऊन कारवाईचा जोर कायम सुरूच ठेवल्याने बांधकाम व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांतही भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, पथकाने आजपर्यंत १७ ठिकाणी कारवाई केली आहे. गट क्रमांक ११८ मधील राघवेंद्र साकूरकर यांचे एका मजल्याचे बांधकाम पाडण्यात आले, तर इंदुदास रणनवरे पाटील यांनी पथकाला सांगितले की, तुम्ही ज्या व्यक्तीला नोटीस दिली तो माझा पार्टनर नाही, त्यामुळे पथकाने रणनवरे पाटील यांना परत नोटीस बजावली असून, पथक विशिष्ट मुदतीनंतर पुन्हा येईल, असे सांगण्यात आले.
आमदाराचे बांधकाम ?
मधुमालतीनगरातील जी प्लस ४ चे बांधकाम हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार रमेश कदम यांचे असल्याचे सांगून पथकावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला होता; परंतु एक एफएसआयचा नियम पथकाने दाखविला.
अखेर दोन मजले खिळखिळे करण्यात आले. ११८ मधील मधुमालतीनगरातील प्लॉट नं. २ आणि ३ मधील पाच मजली इमारतीवर ताफा गेला अन् बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. तेव्हा खादीतील काही मंडळी आली व अहो साहेब, ही बिल्डिंग आ. रमेश कदम यांची असून, बांधकाम पाडणे थांबवा, असे सांगू लागली; परंतु माझ्याकडे थांबविण्याचा अधिकार नाही, तर पाडण्याचा आदेश आहे, त्यामुळे ते दोन मजले खिळखिळे केल्याचे सीईओ अशोक कायंदे म्हणाले.

Web Title: Hammer on two buildings in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.