अतिक्रमणांवर हातोडा
By Admin | Updated: September 20, 2014 00:27 IST2014-09-20T00:13:02+5:302014-09-20T00:27:44+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने आज बीड बायपास आणि दिल्लीगेट परिसरातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली.

अतिक्रमणांवर हातोडा
औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने आज बीड बायपास आणि दिल्लीगेट परिसरातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. जेसीबीने अनधिकृत बांधकामे पाडली. समृद्धी पार्क, बीड बायपास परिसरातील मनपाच्या हद्दीतील विकास आराखड्यातील रस्त्यांतील बांधकाम पथकाने पाडले. आसिफ पटेल यांच्या मालकीचे ते बांधकाम होते, अशी माहिती अधिकारी शिवाजी झनझन यांनी दिली.
दिल्लीगेट परिसरात करण्यात आलेले बांधकामही पालिका पथकाने पाडले. याप्रकरणी काही नगरसेवक व नागरिकांनी मनपाकडे तक्रार केली होती. त्यावरून झनझन यांनी दोन पथके व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारवाईस सुरुवात केली.
दिल्लीगेट परिसरात सकाळी, तर बीड बायपास परिसरात दुपारी कारवाई करण्यात आली.