शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अर्धे शहर कचरामुक्तचा दावा फोल; महानगरपालिकेचे पितळ उघडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:12 IST

कोणताच वॉर्ड कचरामुक्त झालेला नाही. वॉर्डांमध्ये आजही कचरा पडूनच आहे. मात्र, महापालिकेने अर्धे शहर कचरामुक्त केल्याचा दावा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

ठळक मुद्देफसवणूक नेमकी कोणाची स्वत:ची पाठ थोपटून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना काय साध्य करायचे ?

लोकमत चमू : मुजीद देवणीकर, विकास राऊत, साहेबराव हिवराळे, राम शिनगारे, शेख मुनीर, सचिन लहाने

औरंगाबाद : राज्य शासनाने महापालिकेला ९० कोटी रुपये देऊन आठ महिने उलटले तरी अद्याप कचऱ्याचा प्रश्न किंचितही सोडविता आलेला नाही. शहरातील प्रत्येक वॉर्डात, सार्वजनिक रस्ते, दुभाजकांमध्ये कचऱ्याचे अक्षरश: डोंगर साचले असताना महापालिकेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी तब्बल ५१ वॉर्ड कचरामुक्त झाल्याची घोषणा केली. ‘लोकमत’ चमूने बुधवारी मनपाने जाहीर केलेल्या ५१ वॉर्डांपैकी मोजक्याच वॉर्डांची पाहणी केली असता धक्कादायक चित्र समोर आले. कोणताच वॉर्ड कचरामुक्त झालेला नाही. वॉर्डांमध्ये आजही कचरा पडूनच आहे. मात्र, महापालिकेने अर्धे शहर कचरामुक्त केल्याचा दावा करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

शहरातील नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याची सवय लावा, वॉर्डातील ओला कचरा वॉर्डात कंपोस्ट पद्धतीने जिरवा, कचऱ्यावर प्रक्रिया करणारी केंद्रे उभारावीत, असे राज्य शासनाने सांगितले. यानंतर खंडपीठानेही सूचना दिली. महापालिका काहीच करायला तयार नाही. उलट अर्धे शहर कचरामुक्त केल्याची घोषणा करून औरंगाबादकरांची फसवणूक सुरू केली आहे. हा खोटारडेपणा मांडण्यासाठी महापालिकेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औैचित्य शोधावे का? हा सर्वांत मोठा प्रश्न आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करून दिल्ली आणि इतर शहरांमधून काही खाजगी संस्थांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही निविदा प्रक्रियेविना जनजागृतीचे काम सोपविले आहे. या संस्थांनी जिथे-जिथे थोडेफार काम केले त्या वॉर्डांना चक्क कचरामुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. ज्या ५१ वॉर्डांची कचरामुक्त म्हणून घोषणा झाली आहे, त्या वॉर्डांतील नागरिक, नगरसेवक आणि मनपा प्रशासनालाही वस्तुस्थितीची जाणीव आहे..

कुठे गेले प्रक्रिया केंद्रचिकलठाणा, पडेगाव येथे १५० मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. कंत्राटदार नियुक्त करून दोन महिने झाले तरी  मनपाला अद्याप साधा नारळ फोडता आला नाही. ३६ कोटी रुपये अत्याधुनिक यंत्रणा खरेदी करण्यास, ७ वर्षे प्रक्रिया केंद्र चालविण्यासाठी देण्यात आले आहेत. २६ कोटी रुपये देऊन निव्वळ शेड उभारण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. मागील आठ महिन्यांत मनपाला साधे शेड उभारता आले नाहीत. यापेक्षा शहराचे दुसरे दुर्दैव असूच शकत नाही. महापालिकेच्या या भोंगळ कारभारासमोर राज्य शासनानेही हात टेकले, हे विशेष.

काही वॉर्ड अपवाद असतील...५१ पैकी ५१ वॉर्डांमध्ये कचऱ्याचे डोंगर असू शकत नाहीत. पूर्वीसारखा कचरा आता कुठेच नाही. काही ठिकाणी आज किंवा कालपासून कचरा उचलला नसेल असे दृश्य बघायला मिळू शकते. मनपाकडून कचरा उचलण्यास दिरंगाई झाली असेल. एखाद्या वॉर्डात अपवादाने कचरा सापडू शकतो. महापालिकेने मागील काही दिवसांमध्ये रात्रं-दिवस डोळ्या तेल घालून काम केले. अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या काढून तेथे रांगोळ्या, वृक्षारोपण केले. आता तेथे नागरिक कचरा टाकत नाहीत. सकाळी घंटागाडीतच कचरा टाकतात. हा सकारात्मक बदल नक्कीच झाला आहे.-नंदकुमार घोडेले, महापौर

आम्ही कौतुकाची थाप दिली...शहरातील ११५ पैैकी ५१ वॉर्डांनी स्वच्छ वॉर्ड स्पर्धेत भाग घेतला. वॉर्डातील नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, महिलांनी स्वच्छतेच्या उपक्रमात सहभाग घेतला. अनेक वसाहती हळूहळू कचरामुक्त झाल्या आहेत. आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी आदी ठिकाणी महिला स्वत:हून पुढे आल्या आहेत. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करीत आहेत. स्वच्छतेसाठी पुढाकार घेतलेल्या वॉर्डांना आम्ही फक्त कौैतुकाची थाप दिली. काही ठिकाणी थोडाफार प्रमाणात कचरा असू शकतो. आजच कचरा उचलला नसेलही. यात आणखी सुधारणा करण्यात येणारच आहे.-डॉ. निपुण विनायक, आयुक्त

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न