रविवारपासून हज यात्रेकरूंचा प्रवास

By Admin | Updated: September 4, 2014 00:55 IST2014-09-04T00:41:08+5:302014-09-04T00:55:20+5:30

औरंगाबाद : हज यात्रेसाठी यंदा मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २ हजार ४०५ यात्रेकरू जाणार आहेत. रविवार, ७ सप्टेंबरपासून यात्रेकरूंचा प्रवास सुरू होणार आहे.

Haj pilgrims' journey from Sundays | रविवारपासून हज यात्रेकरूंचा प्रवास

रविवारपासून हज यात्रेकरूंचा प्रवास

औरंगाबाद : हज यात्रेसाठी यंदा मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील २ हजार ४०५ यात्रेकरू जाणार आहेत. रविवार, ७ सप्टेंबरपासून यात्रेकरूंचा प्रवास सुरू होणार आहे.
हज यात्रेकरूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, एअर इंडिया, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सीआईएसएफ, आरोग्य विभाग, पोलीस, महापालिका आदींनी विविध तयारी सुरू केली आहे. हज यात्रेसंदर्भात खिदमत-ए-हुज्जाज कमिटीचे करीम पटेल यांनी सांगितले की, ७ ते १६ सप्टेंबरदरम्यान दररोज एका विमानाने यात्रेकरू चिकलठाणा विमानतळावरून रवाना होतील. एका विमानात २३० ते २३५ यात्रेकरूंचा समावेश राहणार आहे.
आमखास मैदानाजवळील ऐतिहासिक जामा मशीद येथे हज कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ओळखपत्र, लसीकरण, आरोग्य प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रांची तपासणी आणि छाननी करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी यात्रेकरूंना तिकीट, पासपोर्ट हुज्जाक कमिटीकडे सोपवावे लागेल. तिसऱ्या दिवशी यात्रेकरूंना ‘अहेराम’ घालण्यात येतील. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर बसद्वारे यात्रेकरू चिकलठाणा विमानतळावर पोहोचतील. ५ सप्टेंबरपासून यात्रेकरू हज कॅम्पमध्ये दाखल होण्यास सुरुवात होईल. कमिटीतर्फे रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पहिला जथा रवाना होणार आहे. यात्रेच्या पहिल्या चार दिवसांत सायंकाळी ६ वाजता यात्रेकरूरवाना होतील. ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजता फ्लाईट जद्दाहसाठी रवाना होणार आहे. १४, १५ आणि १६ सप्टेंबर रोजीही सायंकाळी ६ वाजता विमान उपलब्ध राहील.
यात्रेकरूंची संख्या
जिल्हायात्रेकरूंची संख्या
औरंगाबाद८९४
जालना २९९
नांदेड २९१
परभणी२२१
बीड २१९
अहमदनगर२०३
लातूर १४६
उस्मानाबाद ७०
हिंगोली६२
एकूण २४०५

Web Title: Haj pilgrims' journey from Sundays