गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
By Admin | Updated: June 11, 2014 00:33 IST2014-06-11T00:13:16+5:302014-06-11T00:33:46+5:30
जालना : फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत तालुक्यातील वझर सराटे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
जालना : फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीत तालुक्यातील वझर सराटे येथील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने पंचनामेही करण्यात आले. मात्र, या शेतकऱ्यांना आजवर नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष वैजीनाथ मखर पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दहा दिवसात भरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चार महिन्यापूर्वी तालुक्यासह जिल्ह्यात गारपिटीने धुमाकूळ घालता. यात शेतकऱ्यांची पिके अक्षरश: आडवी झाली. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. येथील शेतकऱ्यांचे गहू, ज्वारी, हरभरा, मोसंबी फळबागा आदींचे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनामे होऊनही नुकसान भरपाई मिळाली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने नुकसान भरपाई दिली. मात्र, वझर सराटे येथील शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित आहेत, असल्याचे निवेदनात म्हटले आहेत.
निवेदनावर वैजीनाथ मखर, बबनराव तायडे, अरूण सराटे, शिवाजी बनसोडे, विलास घारे, लक्ष्मण राऊत, ज्ञानेश्वर मखर, बद्री मखर, नामदेव सराटे, विठ्ठल आढाव, तोताराम राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)
‘स्वाभिमानी’चे निवेदन
नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देऊन मदन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.