पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त

By | Updated: December 5, 2020 04:05 IST2020-12-05T04:05:29+5:302020-12-05T04:05:29+5:30

रूपेश नारायण बसैये (२७, रा.संजयनगर) आणि चेतन कांतीलाल साबदरा (रा. दीपक ट्रेडर्स ), अशी आरोपींची नावे आहेत. जुना मोंढा ...

Gutkha worth Rs 52 lakh seized | पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त

पावणेदोन लाखांचा गुटखा जप्त

रूपेश नारायण बसैये (२७, रा.संजयनगर) आणि चेतन कांतीलाल साबदरा (रा. दीपक ट्रेडर्स ), अशी आरोपींची नावे आहेत. जुना मोंढा येथून शाहगंजमध्ये एका लोडिंग रिक्षाने गुटखा नेण्यात येत असल्याची माहिती खबऱ्याने सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांना दिली. यानंतर पो. नि. पवार, अन्न सुरक्षा अधिकारी सुनील कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी सापळा रचून ३ डिसेंबर रोजी रात्री १.१० वाजता संशयित रिक्षा पकडली. यावेळी रिक्षात आरोपी रूपेश आणि चेतन होते. पंचांसमक्ष रिक्षाची झडती घेतली असता त्यात १ लाख ७६ हजारांचा गुटखा आढळून आला. याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gutkha worth Rs 52 lakh seized