गुटखा पकडला; आरोपी निसटले
By Admin | Updated: May 13, 2014 01:07 IST2014-05-12T23:51:36+5:302014-05-13T01:07:05+5:30
वसमत : अजमेर- हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वेतून वसमतमध्ये आणला जाणारा गुटख्याचा मोठा साठा नांदेड रेल्वे पोलिसांनी पकडला.

गुटखा पकडला; आरोपी निसटले
वसमत : अजमेर- हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वेतून वसमतमध्ये आणला जाणारा गुटख्याचा मोठा साठा नांदेड रेल्वे पोलिसांनी पकडला. गुटखा घेवून येणारे आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या छाप्यातून वसमत गुटखा तस्करांचे प्रमुख केंद्र झाल्याचे समोर आले आहे. घटना घडून तीन दिवस झाले तरीही अद्याप गुन्हा मात्र दाखल नाही. वसमत शहर गुटखा तस्कारांचा अड्डा होवून बसले आहे. शहरातील शुक्रवारपेठेतील वेशीजवळ गुटखा साठवणुकीचे गोदाम असून तेथूनच गुटखा खुलेआम तालुकाभरात वितरित होत आहे. वसमतमधील काही ठराविक पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या आशीर्वादानेच गुटख्याचा व्यवसाय वसमतमध्ये जोरात सुरू झाल्याचेही आरोप होत आहेत. रेल्वे मार्गे वसमत स्थानकावर गुटखा उतरवला जातो तेथून वाहनाद्वारे शुक्रवारपेठमधील गोदामावर हा गुटखा पोहोचत असतो. १० मे रोजी अजमेर- हैदराबाद एक्स्प्रेसमधून नेहमीप्रमाणे गुटख्याचा साठा वसमत रेल्वेस्थानकावर उतरणार असल्याची खबर रेल्वे पोलिसांना लागली. नांदेड रेल्वे पोलिसांचे पथक वसमत रेल्वेस्थानकावर हजर झाले. शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास रेल्वे वसमतच्या स्थानकावर आली व पोलिसांनी प्रवाशांच्या डब्यात शोध मोहिम सुरू करून गुटख्याचा साठा जप्त केला. जप्त केलेला गुटख्याचा साठा घेवून रेल्वे पोलिस नांदेडला रवाना झाले. याप्रकरणी नांदेड रेल्वेचे फौजदार प्रभाकर चिंचणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी छाप्यात शासनाने बंदी घातलेला गुटखा पकडल्याचे सांगितले. याप्रकरणी अन्न व भेसळ विभागाला पत्र देवून पुढील कारवाई करण्याचे कळविले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नेमका किती साठा आहे हे अद्याप स्पष्ट होवू शकले नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी अन्न व भेसळ विभागाकडून तक्रार येणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. या छाप्यात फौजदार प्रभाकर चिंचणे, पोन राठोड, चोपडे, नारनवरे आदी रेल्वे पोलिस कर्मचार्यांनी सहभाग घेतला. आरोपी मात्र फरार असून. त्यामुळे हा माल नेमका कोणाचा हे गुढ उकलू शकले नाही. पोलिसांना पाहताच आरोपी रेल्वेतून उतरून पसार झाल्याचे वृत्त आहे. शहरातील शुक्रवारपेठेतील वेशीजवळ गुटखा साठवणुकीचे गोदाम असून तेथूनच गुटखा खुलेआम तालुकाभरात वितरित होत आहे. वसमतमधील काही ठराविक पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्या आशीर्वादानेच गुटख्याचा व्यवसाय वसमतमध्ये जोरात सुरू झाल्याचेही होत आहेत आरोप १० मे रोजी अजमेर- हैदराबाद एक्स्प्रेसमधून नेहमीप्रमाणे गुटख्याचा साठा वसमत रेल्वे स्थानकावर उतरणार असल्याची खबर रेल्वे पोलिसांना लागली. शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास रेल्वेस्थानकावर आली व पोलिसांनी प्रवाशांच्या डब्यात शोध मोहीम सुरू करून गुटख्याचा साठा जप्त केला. शासनाने बंदी घातलेला गुटखा पकडण्यात आला असून या प्रकरणी अन्न व भेसळ विभागाला पत्र देवून पुढील कारवाई करण्याचे कळविण्यात आले आहे. पथकाने नेमका किती साठा जप्त केला आहे हे अद्याप स्पष्ट होवू शकले नसल्याचेही त्यांचे आहे म्हणणे .