विविध उपक्रमांनी गुरूपौर्णिमा उत्सव
By Admin | Updated: July 13, 2014 00:19 IST2014-07-13T00:04:41+5:302014-07-13T00:19:13+5:30
उस्मानाबाद : व्यास जयंती म्हणजेच गुरू पौर्णिमा हा सण शनिवारी शहरासह जिल्हाभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

विविध उपक्रमांनी गुरूपौर्णिमा उत्सव
उस्मानाबाद : व्यास जयंती म्हणजेच गुरू पौर्णिमा हा सण शनिवारी शहरासह जिल्हाभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध शाळांत विद्यार्थ्यांनी गुरूंना पुष्प देऊन आशीर्वाद घेतले.
उस्मानाबाद शहरातील स्वामी स्वामी समर्थ मंदिरात शनिवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथे गुरू पौर्णिमेनिमित्त पारायण तसेच आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. पारायणात शहरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शिबिरासही चांगला प्रतिसाद मिळाला.
रामानंद महाविद्यालय
उस्मानाबाद : तालुक्यातील काजळा येथील श्री रामानंद महाराज विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक के. एस. राजगुरु, ओ. डी. कुंभार, आर. यू. कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन आहेर भूषण तर आभार प्रिया आदटराव हिने मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
सनराईज प्रायमरी स्कूल
उस्मानाबाद : शहरातील सनराईज प्रायमरी स्कूलमध्ये कार्यानुभव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शिक्षणधिकारी ठाणे डॉ. गणपत मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी जगताप उपस्थित होते. यावेळी मुलांनी स्वत: बनविलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शेख जेबा, शेख आरसा, शितल आकोसकर, अस्मिता शिंदे, स्वप्नाली घाडगे, पूजा गाडेकर, अर्चना राठोड, प्रवीण गाडेकर, संगीता घोडके आदींनी परिश्रम घेतले.
महात्मा गांधी विद्यालय
उस्मानाबाद : शहरातील महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक सचिन लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कदम, अॅड. ए. एम. टेळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी समाधान ठाकर, अनुराधा गोरे, सोनाली रोहिदास आदींनी परिश्रम घेतले.
समर्थ प्राथमिक आश्रमशाळा
उस्मानाबाद : तालुक्यातील येवती येथील श्री समर्थ प्राथमिक आश्रमशाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग पुरी होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रमोद देवकर यांची उपस्थिती होती. यावेळी सौरभ साळुंके, राजकन्या माळी, सचिन रूपनर, वैष्णवी माने, स्वाती भोसले, अस्मिता हुबाले, रोहीत देवकर आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मदन गुरव, महेश पिंपरकर, श्रीनिवास शेळके आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रशांत गिरी यांनी केले. तर आभार महादेवी हुबाले हिने मानले.
राणी तारा राजा प्रशाला
भूम : शहरातील राणी ताराराजा कन्या प्रशालेत विद्यार्थी मंत्रिमंडळाने गुरुजींचे गुलाब पुष्प देऊन आशीर्वाद घेतले. यात विद्यार्थी प्रतिनिधी प्रीती स्वामी यांच्यासह इतर विद्यार्थीही सहभागी झाले होते. यावेळी शिक्षिका वीर, मुख्याध्यापक संतोष अघाव यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्र्थ्यांंना सांगितले. (वार्ताहर)
तेरमध्ये पादुका पूजन
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे गुरुपौर्णिनिमित्त श्रीराम मंदिरामध्ये श्रीगुरु पादुका पूजन व पद्मनाथ महाराज व्यास यांचे प्रवचन झाले. महाप्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच धनगर समाजाच्या वतीने तेर येथे गुरुपौर्णिनिमित्त बिरुदेव यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांची उपस्थिती होती.त्रिविक्रम मंदीरामध्ये आषाढी पोर्णिनिमित्त काल्याचा कार्यक्रम घेण्यात आला. ह. भ.प. प्रल्हाद महाराज सुरवशे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला.