गुरुजींचा कुंचला भावला अन् चित्रकार झालो...

By Admin | Updated: August 13, 2015 00:24 IST2015-08-13T00:06:41+5:302015-08-13T00:24:12+5:30

सितम सोनवणे , लातूर इयत्ता आठवीच्या वर्गात चित्रकलेचे शिक्षक काढत असलेले अप्रतिम चित्र पाहून प्रभावीत झालो़ तेव्हापासून चित्रकलेचा छंद जडला़ आज ३० वर्षानंतरही तोच

Guruji's Kanchala Bhavhala became a painter ... | गुरुजींचा कुंचला भावला अन् चित्रकार झालो...

गुरुजींचा कुंचला भावला अन् चित्रकार झालो...


सितम सोनवणे , लातूर
इयत्ता आठवीच्या वर्गात चित्रकलेचे शिक्षक काढत असलेले अप्रतिम चित्र पाहून प्रभावीत झालो़ तेव्हापासून चित्रकलेचा छंद जडला़ आज ३० वर्षानंतरही तोच उत्साह कायम ठेवला़ चित्रकलेचा शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवत असून, सामाजिक बांधिलकी जपत आपल्या पेन्टींग विक्रीतून मिळालेल्या किमतीच्या ४५ टक्के रक्कम ही अनाथ, निराधार, गरीब होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आरोग्य खर्चासाठी देणार असल्याचे शिवाजी हांडे यांनी ‘लोकमत’ला मुलाखत देताना सांगितले़
आठवीच्या वर्गात शिक्षण घेताना एस़ के़ माने हे चित्रकला विषय शिकवत होते़ खडूच्या सहाय्याने फळ्यावर रेखकलेने विविध चित्र काढताना तल्लीन व्हायचे आणि क्षणात वेगवेगळे चित्रकृती निर्माण करायचे़ ते पाहून मन प्रफुल्लीत व्हायचं़ आपल्याला असे चित्र काढता येतील का, असे सारखे वाटायचे़ त्यामुळे वर्गात सांगितलेल्या सर्व अभ्यासकृती सतत केल्याने हाताला वळण येते, असे गुरुजी सांगत तेच लक्षात घेऊन पाटीवरती सतत रेखांकन करत चित्र-विचित्र चित्र काढत होतो़ पुढे हाच छंद जोपासत चित्र काढू लागलो़ चित्र काढता-काढता शिक्षणासोबत लातूरच्या चित्रकला महाविद्यालयात एटीडीचे शिक्षण पूर्ण केले़ आर्ट मास्टर सोलापूरच्या चित्रकला महाविद्यालयात पूर्ण केले़ या चित्रकलेच्या ध्यासातूनच पुढे विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले़ याच कलेमुळे आजघडीला यशवंत विद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून नावारुपाला आलो आहे़ आज ३० वर्षानंतरही गुरुजींची चित्रकलेची ती प्रेरणा जपत हा छंद जोपासला आहे़ चित्रकलेत रेखाचित्र अर्थात कथाचित्र या प्रकारात जास्त चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे़ रेखाचित्राद्वारे स्त्री जीवनातील विविध पैलू मांडण्याचा प्रयत्न केला आहे़ त्याला रंगसंगतीने चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे़ या कलेचा प्रभाव पाहता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पूणे यांच्या बालभारती पुस्तकातील चित्रांसाठी चित्रकार म्हणून काम करीत आहे़ ही चित्रकला मर्यादीत न राहता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुढे वाढावी, यासाठी सतत प्रयत्नशील आहे़ समाजातील अनाथ, निराधार, गरिब होतकरु विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे होत नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करावी, या उद्देशाने इंद्रधनुष्य चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे़ यात ठेवण्यात आलेल्या पेन्टींगच्या किमतीतील विक्रीमधून आलेल्या ४५ टक्के रक्कम मदत दिली जाणार आहे, अशीही सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी चित्रकलेचा उपयोग होऊ शकतो, याचाही आनंद होत असल्याचे हांडे यांनी सांगितले़

Web Title: Guruji's Kanchala Bhavhala became a painter ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.