शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

गुरुजी लागा तयारीला, मराठवाड्यातील 'झेडपी'च्या सर्व शिक्षकांची होणार परीक्षा

By विकास राऊत | Updated: December 8, 2022 12:41 IST

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, लातूरचे जि. प. सीईओंवर या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील जि. प.च्या सर्व शाळांतील शिक्षकांचे मूल्यांकन व बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी एप्रिल २०२३ पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे. लातूर जि. प.चे सीईओे अभिनव गोयल यांनी जिल्ह्यात राबविलेला पथदर्शी प्रकल्प पूर्ण विभागात पॅटर्न म्हणून राबविण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी हा निर्णय बुधवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

उस्मानाबादचे जिल्हाधिकारी, लातूरचे जि. प. सीईओंवर या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विभागातील जिल्हाधिकारी, जि. प. सीईओंची उपस्थिती होती. शिक्षण, आरोग्य, सामाजिक वनीकरणासह अनेक विषयांवर चर्चा झाली. अध्ययन स्तर शोधल्यावर उपाय करण्याचा डाटा समोर येईल. त्यानंतर शिक्षकांना प्रशिक्षित करून अपडेट करण्यात येईल.

मुलांचे गणित कच्चे, वाक्यलेखन येत नाहीचौथीमधील मुलांना वाक्यलेखन येत नाही. ३० टक्के विद्यार्थ्यांना येते, ७० टक्के मुलांना येणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थीनिहाय मॉनिटरिंग करण्यात येईल. शास्त्रज्ञ, इतिहास, परमवीरचक्र विजेता, ॲस्ट्रोनॉमी, गणित, क्रीडा, सेल्फ डिफेन्स हे विषय विद्यार्थ्यांना आले पाहिजेत. ऑगस्ट महिन्यांत लातूरमध्ये जि. प. शाळेतील ४५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत नव्हता. आता ८५ टक्के विद्यार्थी गणित सोडविण्यापर्यंत आले आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत १०० टक्क्यांपर्यंत हे प्रमाण जाणे अपेक्षित आहे.

मराठवाड्यात ८ ते १० हजार जि. प. शाळाऑगस्ट २०२२ मध्ये लातूर जि. प.ने गुणवत्तावाढीसाठी प्रयोग केला होता. तो प्रयोग मराठवाड्यातील ८ ते १० हजार जि. प. शाळा व ३५ हजारांच्या आसपास शिक्षकांसाठी राबविण्यात येणार आहे. लातूरच्या धर्तीवर पूर्ण विभागात बेसलाईन असेसमेंट करण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आजची परिस्थिती, चार महिन्यांनंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन होईल. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून शिक्षक, विद्यार्थ्यांचे ट्रेकिंग करण्यात येईल.

शिक्षकांसाठी हजेरीपट बंधनकारकशिक्षकांसाठी हजेरीपट बंधनकारक करण्याचा प्रयत्न पुढच्या शैक्षणिक वर्षात करण्यात येईल. सॉफ्टवेअर, क्युआर कोडनुसार हजेरी अपडेट करण्यासाठी विचार होऊ शकतो. यंदाच्या शैक्षणिक वर्षातच शिक्षकांची परीक्षा घेण्यात येईल. मूल्यशिक्षणावर फोकस असणार आहे. प्रत्येक शाळेत लायब्ररी, प्रयोगशाळा, ॲस्ट्रोनॉमी क्लब आहेत. त्याचा प्रभावीपणे वापर केला जाईल. सध्या जि. प. शाळांमध्ये हा उपक्रम असेल. पुढील टप्प्यात मनपा व अनुदानित शाळांचा विचार होईल. एप्रिल २०२३ मध्ये हा उपक्रम पूर्ण करण्याचे प्रयत्न असतील.

टॅग्स :Teacherशिक्षकMarathwadaमराठवाडाzp schoolजिल्हा परिषद शाळा