शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

कामे पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची, मंत्रिपदे नुसती भूषवायची नसतात:अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 14:05 IST

मराठवाड्याला यंदा चांगली मंत्रिपदे मिळाली आहेत. मात्र, मंत्रिपदे नुसती भुषवायची नसतात. मंत्रिपदाचा फायदा घ्या

छत्रपती संभाजीनगर: आज मंत्रिमंडळ बैठकीत अनेक प्रस्तावांना मजुरी देण्यात येईल. भविष्यात हे कामे होतात किंवा नाही हे पाहणे संबंधित पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करावा मंत्रीपद हे मिरवण्यासाठी नाही, अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. ते वंदे मातरम् सभागृहात महापालिकेच्या विविध विकास योजनांच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते.

मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. आज सकाळी विविध विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याबाबत विकासात्मक निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांना केली. तसेच मराठवाड्याला यंदा चांगली मंत्रिपदे मिळाली आहेत. मात्र, मंत्रिपदे नुसती भुषवायची नसतात. मंत्रिपदाचा फायदा घ्या, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी मराठवाड्यातील मंत्र्यांना खडेबोल सुनावले.

अजित पवार पुढे म्हणाले, माझी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी योजनांचा दर आठवड्याला आढावा घेतला पाहीजे. सरकार मराठवाड्यासाठी योजना जाहीर करते. मात्र, नंतर त्या योजनांचे कामच पूर्ण होत नसल्याचे दिसते. यासाठी सरकार ज्या काही योजना जाहीर करेल, त्या योजनांचे काय झाले, याची दर आठवड्याला पालकममंत्र्यांनी माहिती घेतली पाहीजे. आढावा बैठक घेतली पाहीजे. काम कुठपर्यंत आले आहे, कुठे रखडले आहे, याची माहिती आहे. काही अडचणी असतील तर मुख्यमंत्री कार्यालय किंवा उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला पाहीजे. तेथून समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहीजे. असे केले तरच योजना पूर्णत्वास जावू शकतात. तसेच सकाळी लवकर उठून कामाला लागा, लोक येतात असा सल्लाही उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्र्यांना यावेळी दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAjit Pawarअजित पवारMarathwadaमराठवाडा