पालकमंत्री लसीकरण बूथवर भेट देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:06 IST2021-01-16T04:06:22+5:302021-01-16T04:06:22+5:30

मनपाला दिले ३ हजार नोटीस बोर्ड औरंगाबाद : जॉला बोर्ड लिमिटेडतर्फे महापालिकेला ३ हजार नोटीस बोर्ड देण्यात आले. यावेळी ...

The Guardian Minister will visit the vaccination booth | पालकमंत्री लसीकरण बूथवर भेट देणार

पालकमंत्री लसीकरण बूथवर भेट देणार

मनपाला दिले ३ हजार नोटीस बोर्ड

औरंगाबाद : जॉला बोर्ड लिमिटेडतर्फे महापालिकेला ३ हजार नोटीस बोर्ड देण्यात आले. यावेळी शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, जॉली बोर्डचे अनिल शिंदे, किशोर गोरे, संजय पवार आदींची उपस्थिती होती.

मराठवाड्यात २३,७१५ जण क्वारंटाइन

औरंगाबाद : मराठवाड्यात होम आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनचा आकडा सध्या २३ हजार ७१५ इतका आहे. त्यामध्ये ९ हजार ६२६ नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आलेले आहे, तर १४ हजार ८८ नागरिक इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन आहेत. होम क्वारंटाइनचा आकडा ३ हजारांनी वाढला आहे. मागच्या आठवड्यात ६ हजार ४७४ नागरिक होम क्वारंटाइन होते.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज शहरात

औरंगाबाद : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे १६ जानेवरी रोजी शहरात येत आहेत. दुपारी २ वा. औरंगाबाद येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी ३ वा. चिकलठाणा येथे घनकचरा प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण, त्यानंतर दुपारी ३.३० वा. क्रांतीचौक येथे सायकल ट्रॅकचे लोकार्पण. सायं. ४ वा. पोलीस आयुक्त कार्यालय येथे मास्टर सिस्टम इंटिग्रेटर प्रकल्पांतर्गत कमांड कंट्रोल केंद्राचे लोकार्पण, स्मार्ट सिटी डिस्प्ले व टी.व्ही. सेंटर येथे बी.ओ.टी. तत्त्वावर शॉपिंग काम्प्लेक्स आणि स्टेडियमचे लोकार्पण सायं. ४.३० वा. होईल. सायं. ६ वा. शहरातील काही निवडक मान्यवरांसोबत जालना रोडवरील एका हॉटेलात संवाद कार्यक्रमाला ते हजेरी लावतील. रात्री ८ वा. विमानाने मुंबईला विमानाने रवाना होतील.

Web Title: The Guardian Minister will visit the vaccination booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.