शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

जीएसटी कमी होऊनही टीव्ही खरेदीदारांना नाही फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 7:29 PM

ग्राहकांमध्ये मात्र जीएसटीच्या सवलतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्देइलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्यांचे कंपनीकडे बोट जीएसटी विभागाकडून कारवाईचे संकेत

औरंगाबाद : जीएसटी परिषदेने ३२ इंचापेक्षा कमी आकारातील टीव्हीवरील जीएसटी दर कमी केला आहे. मात्र, काही विक्रेते वगळता अनेक विक्रेत्यांनी कंपनीकडून अजून त्यासंदर्भात काहीच सूचना आल्या नसल्याचे सांगत दर कमी करण्यास असमर्थता दर्शविली. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये मात्र जीएसटीच्या सवलतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

जीएसटी परिषदेने वस्तू व सेवा कराचे दर कमी केले आहेत. दैनंदिन वापरातील विविध २३ वस्तूंवरील जीएसटी हा २८ टक्क्यांवरून १८, १२ आणि ५ टक्के या टप्प्यांमध्ये कमी करण्याचा निर्णय घेतला होता. या बदललेल्या दरानुसार आज १ जानेवारीपासूनच प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यात सर्वांना जास्त आकषर्ण म्हणजे ३२ इंचापर्यंतचे टीव्ही स्क्रीनचे. या टीव्हीचा कर दर २८ टक्क्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणून ठेवला आहे. यामुळे १० टक्क्यांनी टीव्हीचे दर कमी होणे अपेक्षित होते.

मात्र, काहींनी आज दर कमी केले नाहीत. कारण, त्या व्यापाऱ्यांनी सांगितले की, यासंदर्भातील सूचना कंपनीने आम्हाला अजून पाठविल्या नाहीत. आम्ही १० टक्के किमती कमी करून आज टीव्ही विकला व उद्या कंपनीने आम्हाला क्रेडिट नोट पाठविले नाही, तर आम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही. यामुळे आज टीव्हीचे भाव ‘जैसै थे’ ठेवले असल्याचे त्या व्यापाऱ्यांनी नमूद केले, तर काही इलेक्ट्रॉनिक्स व्यापाऱ्यांनी १० टक्के कमी करून ३२ इंचापर्यंतचे टीव्ही विक्री करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार जीएसटी परिषदेने निर्णय घेतला यामुळे कंपन्याना क्रेडिट नोट द्यावीच लागेल व आम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल.

यामुळे आम्ही १० टक्के किंमत कमी करून टीव्ही विकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात राज्य जीएसटी विभागातील उपआयुक्त टी.एन. पठाण यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी २८ टक्के जीएसटी भरून जरी ३२ इंचापर्यंतचे टीव्ही शोरूममध्ये ठेवले असतील तरी त्यांना आजपासून ग्राहकांकडून १८ टक्केच जीएसटी घ्यावा लागणार आहे. झालेला १० टक्के कमी कराचा फायदा थेट ग्राहकांना द्यावा लागणार आहे. यात व्यापाऱ्यांचे काहीच नुकसान नाही. कारण, त्यांनी इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणारच आहे. मात्र, कोणी जर कमी झालेल्या जीएसटी दराचा फायदा ग्राहकांना देत नसल्याचे निदर्शनात आल्यास कारवाई होऊ शकते. 

केंद्रीय नफेखोरीविरोधी प्राधिकरण करू शकते कारवाईवस्तूंवरच्या छापील किमती (एमआरपी) रातोरात बदलणे शक्य नसले तरी जीएसटीमध्ये कमी झालेल्या कर दराचा फायदा हा शेवटच्या  ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे. केंद्र सरकारने  या करता केंद्रीय नफेखोरीविरोधी प्राधिकरण स्थापन केले आहे. या प्राधिकरणाने कर दराच्या घटीचा फायदा ग्राहकांना न देणाऱ्या उत्पादक, दुकानदारांवर किंवा सेवा पुरवठादारांवर कडक कारवाई करावी, असे सीए रोहन आचलिया म्हणाले.

टॅग्स :GSTजीएसटीGST Officeमुख्य जीएसटी कार्यालयTelevisionटेलिव्हिजन