गावात नळयोजना असताना घशाला कोरड
By Admin | Updated: May 13, 2014 01:06 IST2014-05-12T23:53:47+5:302014-05-13T01:06:40+5:30
इब्राहिम जहागीरदार , कुरूंदा राष्टÑीय पेयजल योजनेतून नळयोजनेचे मार्गी लागलेले काम कागदावरच राहिले आणि नळयोजनेचे पाणी गावात आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत.

गावात नळयोजना असताना घशाला कोरड
इब्राहिम जहागीरदार , कुरूंदा राष्टÑीय पेयजल योजनेतून नळयोजनेचे मार्गी लागलेले काम कागदावरच राहिले आणि नळयोजनेचे पाणी गावात आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. अशा स्थितीत नळयोजनेच्या कामाचे नियोजनाअभावी नळयोजना असून कुरूंदावासियांना पाणी मिळालेले नाही. परिणामी गावासाठी योजना असूनही ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे. १५ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या कुरूंद्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. घरोघरी बोअर व हातपंप असल्याने सध्यातरी पाणी टंचाई भेडसावत नाही. यंदा अधिक पाऊस पडल्यामुळे पाणीपातळी खालावली नाही. ३० वर्षांपूर्वीची नळयोजना पूर्णत: मोडकळीस आल्यानंतर या गावाचा २२ गाव नळ योजनेमध्ये समावेश करण्यात आला. युती सरकारच्या काळामध्ये मंजूर झालेली ही नळयोजना आघाडी सरकारच्या काळात मार्गी लागली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर जेमतेम दोन महिने पाच दिवसाआड पाणी अर्ध्या गावाला मिळाले. त्यानंतर २२ नळ योजना देखील कोलमडली. त्यामुळे शासनस्तरावर नव्याने राष्टÑीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली. ४५ लाख रुपयांच्या निधीमधून सायफन कालव्यावर विहिर अधिग्रहण करून २२ गाव नळयोजनेच्या पाण्याच्या टाकीत पाणी आणण्यात आले. हे पाणी जुन्या पाईपलाईनद्वारे गावात सोडण्यात येणार होते; परंतु २२ गाव नळयोजनेतील पाईपलाईन जागो-जागी फुटल्याने गावात पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे नळयोजना मार्गी लागलेली असताना देखील कुरूंदावासियांना पाणी मिळालेले नाही. नळयोजना मार्गी लागून जवळपास एका वर्षाचा कालावधी होत आहे. उन्हाळा संपत आला तरी नळ योजनेचे पाणी आलेले नाही. नवीन पाईप करण्यासाठी व दुरूस्तीसाठी निधीची मागणी कुरूंदा ग्रा.पं. ने केली होती. त्याची सध्यातरी दखल घेतल्या गेली नाही. कुरूंदा गावासाठी तीन नळयोजना आखण्यात आल्या. त्यापैकी दोन नळयोजना कायमच्या बंद पडल्या आहेत. सध्याची राष्टÑीय जल नळयोजना पाईपलाईनच्या नियोजनाअभावी कुचकामी ठरली आहे. गावाची लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याचा मुबलक साठा पाहिजे. नळयोजना मार्गी लागली तरी पाण्याचा नियोजन आराखडा शासनस्तरावर आखण्यात आला नाही. नेतेमंडळीचे झाले दुर्लक्ष कुरूंद्यातील नळ योजनेकडे प्रशासनासह नेतेमंडळी देखील साफ दुर्लक्ष करीत आहेत. पाण्याचा मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधी आणण्यास अपयश आल्याने राष्टÑीय जल नळयोजना अडगळीत पडली आहे.