वेरूळ (छत्रपती संभाजीनगर): येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर ३ मार्च २०२६ (मंगळवार) रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत बंद राहणार आहे. धुलिवंदनच्या दिवशीच हे ग्रहण असल्याने आणि मंगळवारी वेरूळ लेणीही बंद असल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
धार्मिक परंपरेमुळे निर्णयमंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रहणाच्या काळात धार्मिक परंपरेनुसार मंदिराचे दरवाजे बंद ठेवले जातात. ३ मार्च रोजी दुपारी ३:२० ते सायंकाळी ६:४७ या वेळेत खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. त्यामुळे दुपारी ३:०० वाजल्यापासूनच गाभाऱ्यातील प्रवेश आणि दर्शन थांबवण्यात येईल. ग्रहण संपल्यानंतर मंदिराची स्वच्छता आणि शुद्धीकरण पूजा केली जाईल. त्यानंतर सायंकाळी ७:०० वाजता मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुले होईल.
भाविकांना नियोजनाचे आवाहनमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कुणाल दांडगे यांनी भाविकांना वेळेचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे ३ मार्च रोजी मंगळवार असल्याने वेरूळ लेणी दर आठवड्याप्रमाणे देखभाल व दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. त्यातच दुपारी मंदिरही बंद राहणार असल्याने बाहेरगावच्या पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे देवस्थान प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाचे वेळापत्रक: मंदिर बंद राहण्याची वेळ: दुपारी ३:०० ते सायंकाळी ७:००ग्रहणाचा काळ: दुपारी ३:२० ते सायंकाळी ६:४७दर्शन पुन्हा सुरू: सायंकाळी ७:०० वाजताविशेष टीप: मंगळवार असल्यामुळे वेरूळ लेणी पूर्ण दिवस बंद राहतील.
Web Summary : Grishneshwar temple will be closed March 3rd, 3 PM to 7 PM, due to a lunar eclipse. This coincides with Dhulivandan and Verul caves being closed, potentially inconveniencing tourists. The temple reopens after purification rituals.
Web Summary : चंद्रग्रहण के कारण 3 मार्च को घृष्णेश्वर मंदिर दोपहर 3 बजे से शाम 7 बजे तक बंद रहेगा। यह धुलिवंदन और वेरुल गुफाओं के बंद होने के साथ है, जिससे पर्यटकों को असुविधा हो सकती है। शुद्धि अनुष्ठानों के बाद मंदिर फिर से खुलता है।