यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:07 IST2021-03-13T04:07:06+5:302021-03-13T04:07:06+5:30

औरंगाबाद : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांच्या ...

Greetings to Yashwantrao Chavan | यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

औरंगाबाद : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारतीतील तैलचित्रास प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाठ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजिब खान, बहि:शाल शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. कैलास पाथ्रीकर, उपकुलसचिव डॉ. दिगंबर नेटके, सहायक कुलसचिव भागचंद ढगे, संजय शिंदे, कक्षाधिकारी अर्जुन खांड्रे, व्यंकट खैरनार, एस. बी. चव्हाण, अनिल खामगावकर, राजेश्वर मोहिते, इंदल जाधव, किशोर उबाळे, डॉ. दैवत सावंत आदींची उपस्थिती होती.

कॅप्शन : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांच्या प्रतिमेला अभिवादनप्रसंगी डॉ. शाम शिरसाठ, डॉ. मुस्तजिब खान आदी.

Web Title: Greetings to Yashwantrao Chavan