शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

आनंदोत्सव ! तुताऱ्यांच्या निनादात केले मुलीच्या जन्माचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:50 AM

कन्यारत्न झाले म्हणून भोसले परिवाराकडून करण्यात येणारा आनंदोत्सव पाहून येणारी-जाणारी माणसे आश्चर्य व्यक्त करीत होती.

ठळक मुद्दे बुधवारी दुपारी एक-दीडच्या सुमारास गारखेडा परिसरातील मॅटर्निटी होमच्या दारात तुताऱ्या वाजू लागल्या. नवी कोरी गाडी दवाखान्याच्या दारात येऊन उभी ठाकली.

औरंगाबाद : बुधवारी दुपारी एक-दीडच्या सुमारास गारखेडा परिसरातील मॅटर्निटी होमच्या दारात तुताऱ्या वाजू लागल्या. नवी कोरी गाडी दवाखान्याच्या दारात येऊन उभी ठाकली. बच्चेकंपनी हातात फुगे घेऊन बागडू लागली, हे सर्व चित्र पाहून काय होते आहे, हे पाहण्यासाठी येणारी-जाणारी माणसे थबकत होती आणि कन्यारत्न झाले म्हणून भोसले परिवाराकडून करण्यात येणारा आनंदोत्सव पाहून आश्चर्य व्यक्त करीत होती.

मुलगी झाली म्हणून तिला नाकारणारे, मुलीच्या जन्माने दु:खी होणारे अनेक लोक समाजात आहेत. पहिली मुलगी झाली तर एकवेळ कौतुक होते. मात्र, दुसरी मुलगी झाल्यावर नाराज होणारे बहुसंख्य आहेत. दीपक आणि शीतल भोसले या दाम्पत्यालाही असाच अनुभव आला.त्यांना ११ जून रोजी कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांची मोठी मुलगी वेदिका ही पाच वर्षांची आहे. दुसरी मुलगी झाल्यानंतर दवाखान्यात येणारा प्रत्येक नातेवाईक तसेच मित्रमंडळी अरे मुलगी झाली का... असे म्हणत सांत्वन करायला आल्याप्रमाणे भोसले दाम्पत्याशी संवाद साधत होता.

ही गोष्ट भोसले दाम्पत्याला सारखी खटकत होती. कारण वास्तविक त्यांना दुसरी मुलगी झाल्याचा अत्यानंद झाला होता. मुलगा की मुलगी आहे, यापेक्षा आपले अपत्य सुदृढ आहे, यातच त्यांना आनंद होता. त्यामुळे दुसऱ्या मुलीच्या जन्माने आपण नाराज नसून आनंदी आहोत, हेच सगळ्यांना दाखवून देण्यासाठी त्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्याचे ठरविले. बुधवारी बाळाला दवाखान्यातून सुटी मिळाली आणि त्यांनी दवाखान्यापासून ते घरापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढून कन्यारत्न प्राप्तीचा आनंद साजरा केला.

घर आनंदाने उजळून निघेलआमचे एकत्र कुटुंब असून आमच्या कुटुंबात मुलींना सन्मानाने वागविले जाते. दुसरी नात झाली याचा मला मनापासून आनंद आहे. मला एक आणि माझ्या जाऊबार्इंना दोन अशा आमच्या पिढीत कुटुंबात तीन मुली आहेत. आता या मुलींची जागा माझ्या नाती घेतील आणि घर आनंदाने उजळून टाकतील, अशी आनंददायी प्रतिक्रिया लता भोसले या बाळाच्या आजीने दिली. दवाखान्यात असा प्रसंग पहिल्यांदाच घडला, असे डॉ. सीमा लटुरिया यांनी सांगतले. व्यावसायिक असणाऱ्या भोसले यांनी काही दिवसांपूर्वी चारचाकी बुक केली होती. कन्यारत्न प्राप्तीच्या आनंदोत्सवानिमित्त त्यांनी मुलीला घरी घेऊन जाण्याच्या दिवशी गाडीचा ताबा घेतला आणि नव्या कोऱ्या गाडीतून मुलीला घरी नेले.

टॅग्स :Familyपरिवारhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद