भय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:50+5:302020-12-17T04:26:50+5:30
माजी सभापती एकनाथ त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अभिवादन सभेत प्रा. भारत शिरसाट यांचे प्रमुख भाषण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

भय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
माजी सभापती एकनाथ त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अभिवादन सभेत प्रा. भारत शिरसाट यांचे प्रमुख भाषण झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाभिमानाची चळवळ भय्यासाहेबांनी पुढे नेली. जनसामान्यांत मिसळून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करता यावा म्हणून भैय्यासाहेबांनी बौद्धाचार्य अशी पदवी निर्माण करून कार्यकर्ते तयार केले. चैत्यभूमीचे निर्माते भय्यासाहेबच,असे उद्गार प्राध्यापक शिरसाठ यांनी यावेळी काढले. सामाजिक कार्यकर्ते अंबादास रगडे, आर.एन.वानखेडे, वंचित बहुजन आघाडीचे योगेश बन यांचीही भाषणे झाली.
बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंचचे रामभाऊ पेटकर यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीरंग ससाणे यांनी आभार मानले. संभाजी गायकवाड रचित गीत उत्तम मस्के यांनी यावेळी सादर केले. साहित्यिक टी एस चव्हाण, कवी किशन पवार, पंडितराव तुपे,अरुण जाधव,प्रवीण जमधडे,रतनकुमार साळवे,देविदास कोळेकर यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.