पुन्हा तूर खरेदीला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:34 IST2017-08-26T00:34:33+5:302017-08-26T00:34:33+5:30
नेक दिवसांपासून चर्चेत असलेला तूर प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात मार्गी लागण्याची चिन्हे असले तरी बाजार समितीत तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकºयांना तुरीची माहिती घेतली असता तुरीची विक्री केल्याची माहिती शेतकरी देत असल्याचे पुढे आले आहे.

पुन्हा तूर खरेदीला हिरवा कंदील
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला तूर प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात मार्गी लागण्याची चिन्हे असले तरी बाजार समितीत तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकºयांना तुरीची माहिती घेतली असता तुरीची विक्री केल्याची माहिती शेतकरी देत असल्याचे पुढे आले आहे.
नाफेड तर्फे होणाºया तुर खरेदीचा नुसता बोलबालाच होत चालला आहे. वेळोवेळी बदलत असलेल्या शासन निर्णयामुळे शेतकरीही गोंधळून गेले आहेत. आता तूर खरेदीसाठी पुन्हा परवानगी मिळाल्यामुळे नोंदणी केलेल्या ४ हजार ५०० शेतकºयांपैकी बहुतांश शेतकºयांना फोन करुन तूर खरेदीसाठी घेऊन येण्यास विचारले असता. तुरीची विक्री केल्याचीच उत्तरे मिळत आहेत. मध्यंतरी खाजगी बाजारात तुरीला तब्बल ५ हजार रुपये भाव मिळाल्याने बाजार समितीत नोंदणी केलेल्या शेतकºयांनी या संधीचा फायदा घेऊन तुर विकुन मोकळे झाले आहेत. नोंदणी केलेल्या शेतकºयांच्या आकडेवारीवरुन तब्बल ५४ हजार क्विंटल तुरीची खरेदी होणार होती. मात्र वेळोवेळी बदलत असलेल्या शासन निर्णयाने गोंधळात पडलेल्या शेतकºयांनी तर मिळेल त्या भावाने तुरीची विक्री करुन टाकली आहे. आता नोंदणी केलेल्यापैकी किती शेतकºयाकडे तूर बाकी आहे. हा एक गहण प्रश्न आहे.