शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:05 IST2021-04-07T04:05:12+5:302021-04-07T04:05:12+5:30

अब्दुल सत्तार, महसूल राज्यमंत्री शैक्षणिक क्षेत्रासाठी संपूर्ण आयुष्य वेचले फातमा झकेरिया आणि डॉक्टर रफिक झकेरिया यांनी संपूर्ण आयुष्य शैक्षणिक, ...

Great loss to the educational, social sector | शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी

शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी

अब्दुल सत्तार, महसूल राज्यमंत्री

शैक्षणिक क्षेत्रासाठी संपूर्ण आयुष्य वेचले

फातमा झकेरिया आणि डॉक्टर रफिक झकेरिया यांनी संपूर्ण आयुष्य शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य केले.

फातमा झकेरिया यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका देणारे आहे. मौलाना आझाद एज्युकेशन ट्रस्टच्या स्थापनेमुळे प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या मराठवाड्याच्या शैक्षणिक क्रांतीला चालना मिळाली. मी या संस्थेचा विद्यार्थी आहे, याचा मला अभिमान आहे. डॉक्टर साहेबांच्या निधनानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी फातमा झकेरिया अत्यंत यशस्वीरीत्या त्यांचे कार्य पुढे नेत होत्या. मराठवाड्यातील असंख्य तरुण- तरुणींनी या शैक्षणिक संस्थेत ज्ञानार्जनाचे काम केले. या दुःखद परिस्थितीत मला अल्लामा इक्बाल यांचा एक शेर प्रखरतेने आठवत आहे.

‘आसमा तेरी लहेद पर शबनम अफशानी करे, सब्ज- ए- नाैरुस्ता इस घर की निगेबानी करे...’

-डॉ. जावेद मुकर्रम, इस्लामचे गाढे अभ्यासक

Web Title: Great loss to the educational, social sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.