शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

औरंगाबादमध्ये घसरला अवयवदानाचा आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 19:36 IST

अजूनही अवयवांच्या प्रतीक्षेत शेकडो रुग्ण ‘व्हेटिंलेटर’वर

ठळक मुद्देचार वर्षांत ७६ जणांना मिळाले नवीन आयुष्य २७६ रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : मराठवाड्यात चार वर्षांपूर्वी पहिले अवयवदान झाले आणि अवघ्या काही महिन्यांत अवयवदानाची चळवळ वाढली. एका व्यक्तीच्या अवयवदानाने अनेकांना नवीन आयुष्य मिळाले. परंतु गेल्या वर्षभरात अवयवदानाचा आलेख घसरला आहे. परिणामी अवयवांच्या प्रतीक्षेत मराठवाड्यात शेकडो रुग्ण ‘व्हेंटिलेटर’वर आहेत. शासनस्तराबरोबर प्रत्येक व्यक्तीकडून अवयवदानाच्या चळवळीला हातभार लावण्याची गरज आहे.

जगभरात १३ आॅगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिवस म्हणून पाळण्यात येतो. अवयवदान हे सर्वश्रेष्ठदान समजले जाते. एका ब्रेनडेड व्यक्तीच्या अवयवदानाने म्हणजे किमान सहा जणांना जीवदान मिळू शकते.  औरंगाबादेत १५ जानेवारी २०१६ रोजी पहिले अवयवदान झाले आणि मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीला सुरुवात झाली. वर्षभरानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण आणि २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पहिले यकृत प्रत्यारोपण करून मराठवाड्याने नवीन इतिहास रचला. प्रत्यारोपणासाठी अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांच्या आयुष्यात उजाडलेली ही नवीन पहाट होती. 

मराठवाड्यात २०१६ पासून आतापर्यंत २४ ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान झाले आहे. यातून ४५ किडनी, २१ यकृत आणि १० हृदय, अशा ७६ अवयवांचे प्रत्यारोपण झाले. औरंगाबादसह पुणे, मुंबई, नागपूर याठिकाणी अवयवांचे प्रत्यारोपण झाले. यात दोन हृदयांचे चेन्नई येथे प्रत्यारोपण झाले. याव्यतिरिक्त २८ नेत्ररोपणदेखील झाले. त्यामुळे अनेकांना दृष्टीही मिळाली.  गेल्या काही कालावधीत या चळवळीला मराठवाड्यात अनेक कारणांनी ‘ब्रेक ’ लागत आहे. यावर्षी आतापर्यंत केवळ दोन ब्रेनडेड व्यक्तींचे अवयवदान झाले. या दानाबाबत आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर होण्यासाठी अनेक संस्था प्रयत्न करीत आहेत. अनेक रुग्णालयांकडून ब्रेनडेड जाहीर केले जात नाही. त्यामुळे ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचता येत नसल्याचीही बाब पुढे आली आहे.

२७६ रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत मराठवाड्यात सध्या तब्बल २७६ रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. याबरोबरच ८६ रुग्णांना यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे. तुलनेत अवयवदानाचे प्रमाण कमी असल्याने अवयवांसाठी गरजू रुग्णांची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.

१२ हजार लोकांनी भरली संमतीपत्रेशहरातील औरंगाबाद युथ सोशल वेलफेअर फाऊंडेशनतर्फे अवयवदानाविषयी जनजागृती केली जाते. फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात १२ हजार लोकांनी अवयवदानाविषयी संमतीपत्रे भरली आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच ‘झेडटीसीसी’चे सदस्य राजेशसिंह सूर्यवंशी यांनी सांगितले.

इतरांनाही प्रेरणा मिळतेयज्या समाजात राहतो, त्या समाजाप्रती काहीतरी देणे असते, अशी वडिलांची धारणा होती. त्यामुळे ओढावलेल्या प्रसंगात वडिलांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे इतरांना जीवदान मिळाले. आमच्या कुटुंबियांच्या या निर्णयाने समाजातील इतरांनाही प्रेरणा मिळत आहे. अनेक जण अवयवदानाविषयी विचारणा करतात.- नितीन माठे, अवयवदात्याचा मुलगा

ब्रेनडेड जाहीर होणे महत्त्वाचे मेंदू जरी मृत झाला, तरी रुग्णांचे इतर अवयव कार्यरत असतात. अशा वेळी रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. रुग्णालयांनी ब्रेनडेड जाहीर करणे, हे गरजेचे असते. त्यानंतरच ‘झेडटीसीसी’ला माहिती मिळते आणि नातेवाईकांचे समुपदेशन केले जाते. अवयवदानाचे प्रमाणही काहीसे कमी झाले आहे. अवयवदान वाढविण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जाते.- मनोज गाडेकर, समन्वयक, झेडटीसीसी 

गैरसमज दूर व्हावा जानेवारी २०१६ मध्ये अवयवदानाची चळवळ सुरू झाली. प्रारंभी मोठ्या प्रमाणात अवयवदान झाले. मात्र, गेल्या वर्षभरात प्रमाण कमी झाले आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानाने सहा जणांना जीवदान मिळते. अवयवदानाविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. नातेवाईक, मित्र परिवाराला प्रेरित केले पाहिजे.- डॉ. आनंद देवधर, हृदयरोग शल्यचिकित्सक

अवयवदानाची स्थिती वर्ष    अवयवदान२०१६    ९२०१७    ६२०१८    ७२०१९ (आतापर्यंत)    २एकूण    २४

टॅग्स :Organ donationअवयव दानHealthआरोग्यAurangabadऔरंगाबादMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल