पंधरा दिवसांत मिळणार अनुदान
By Admin | Updated: May 1, 2017 00:34 IST2017-05-01T00:28:50+5:302017-05-01T00:34:17+5:30
वडीगोद्री : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालसमारे करण्यात येणारे उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले.

पंधरा दिवसांत मिळणार अनुदान
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील फळबाग शेतकऱ्यांचे फळबागेचे रखडलेले अनुदान येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांना वाटप करण्याचे आश्वासन तहसील कार्यालयाने शेतकऱ्यांना दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालसमारे करण्यात येणारे उपोषण तुर्तास मागे घेण्यात आले.
सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीने फळबाग शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. याबाबत शेतकऱ्यांनी विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे अनुदान देण्याची मागणी केली होती. परंतु गेल्या चार वर्षापासून याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत असल्याने फळबाग शेतकरी हैराण झाले होते.आता अनुुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले. (वार्ताहर)