उदगीर तालुक्यात ११३१ घरकुले मंजूर

By Admin | Updated: July 9, 2014 00:31 IST2014-07-08T23:08:12+5:302014-07-09T00:31:32+5:30

उदगीर : इंदिरा आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत सन २०१४-१५ सालासाठी उदगीर तालुक्यात ११३१ घरकुले बांधकाम करण्यासाठी मंजुरी मिळाली

Grant of 1131 houses in Udgir taluka | उदगीर तालुक्यात ११३१ घरकुले मंजूर

उदगीर तालुक्यात ११३१ घरकुले मंजूर

उदगीर : इंदिरा आवास व रमाई आवास योजनेअंतर्गत सन २०१४-१५ सालासाठी उदगीर तालुक्यात ११३१ घरकुले बांधकाम करण्यासाठी मंजुरी मिळाली असून, यात मागासवर्गीयांसाठी ९९१ तर १४० घरकुले इतर जातीतील नागरिकांसाठी मंजूर झाली आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी डी़बी़गिरी यांनी दिली़
उदगीर तालुक्यात मागासवर्गीयांसाठी सर्वाधिक ७९ त्यापाठोपाठ हेर येथे ७१ घरकुले मंजूर झाली आहेत़ भाकसखेडा १३, इस्लामपूर, चिघळी १५, शेल्हाळ १६, कुमठा, करवंदी १७, पिंपरी, रावणगाव १८, आवळकोंडा, वाढवणा खु़ १९, डोंगरशेळकी, डिग्रस प्रत्येकी २०, बामणी २१, येणकी, वांगदरी २२, लोणी २४, माळेवाडी २६, तोंडार २७, धोंडहिप्परगा २९, मलकापूर ३१, मादलापूर ३३, लोहारा २८, गुडसूर, तोंडचिर प्रत्येकी ४२, नावंदी ४३, इतर जातीतील लोकांसाठी देवर्जन,धोतरवाडी, हणमंतवाडी ३४, कल्लूर ३२, रावणगाव ३४, आरसनाळ १३, रमाई आवास योजनेअंतर्गत गंगापूर १३, सोमनाथपूर १२, खेर्डा, मोघा प्रत्येकी ११, चांदेगाव, कौळखेड प्रत्येकी १०, कल्लूर, वाढवणा बु, मोर्तळवाडी, हाळी, हंगरगा प्रत्येकी ९, कासराळ, निडेबन येथे प्रत्येकी ८, करडखेल, तादलापूर, चौंडी प्रत्येकी ७, तोगरी, शिरूर, हंडरगुळी येथे प्रत्येकी ६, बलसकरगा, वायगाव, सताळा, लिंबगाव, चिमाचीवाडी येथे प्रत्येकी ५, करडखेल, नेत्रगाव, जानापूर, बनशेळकी येथे प्रत्येकी ४, शंभू उमरगा, देऊळवाडी, तिवटग्याळ, एकुर्का रोड येथे प्रत्येकी ३, कुमदाळ, हेर, कोदळी, आडोळवाडी येथे प्रत्येकी २, होणीहिप्परगा, क्षेत्रपाळ, मल्लापूर, सुकनी, सुमठाणा, हैबतपूर, हिप्परगा (अ़), दावणगाव येथे प्रत्येकी १ असे एकूण ११३१ घरकुले बांधकाम करण्यास मंजुरी मिळाली आहे़
लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली असून, लाभार्थ्यांनी ९, १०, ११ जुलै रोजी पंचायत समिती उदगीर येथे हजर राहून घरकुल बांधकामासाठी बँक खाते क्रमांकासह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सभापती अंजली माने, उपसभापती सोपानराव ढगे, गटविकास अधिकारी डी़बी़गिरी यांनी केले आहे़ (वार्ताहर)

Web Title: Grant of 1131 houses in Udgir taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.