आजीची रक्षा भूविसर्जन करून त्या जागी केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:17+5:302021-05-05T04:07:17+5:30
सोनाबाई माधवराव दौड यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची रक्षा जमा करून भूविसर्जन म्हणजे स्वतःच्या शेतात खड्डे ...

आजीची रक्षा भूविसर्जन करून त्या जागी केले वृक्षारोपण
सोनाबाई माधवराव दौड यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची रक्षा जमा करून भूविसर्जन म्हणजे स्वतःच्या शेतात खड्डे करून त्यात टाकली. त्या ठिकाणी आंब्याची ५ झाडे लावण्यात आली. सध्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले असून, झाडे लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
झाड हाच प्राणवायू देणारा एकमेव झरा आहे. तो झरा सतत झरत रहावा. वृक्षतोड, वणवा, औद्योगिकीकरण, शहरीकरणामुळे झाडे वातावरणातून विरळ होत आहेत. जागतिक तापमान वाढीचे ते मुख्य कारण आहे. पवन दौड व त्यांच्या कुटुंबीयांनी एक आदर्श जगापुढे ठेवला आहे. अन्य ठिकाणी देखील नागरिकांनी आचरण करावे.
- डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड.
फोटो : पानवडोद बु येथे रक्षा विसर्जन न करता वृक्षारोपण करताना दौड कुटुंब
040521\img_20210504_173757_1.jpg
आजीच्या रक्षा भूविसर्जन करून त्या जागी केले वृक्षारोपण