‘ईद’च्या पूर्वसंध्येला भव्य कौमी एकता रॅली
By Admin | Updated: December 23, 2015 23:53 IST2015-12-23T23:34:44+5:302015-12-23T23:53:48+5:30
लातूर : ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बुधवारी लातुरात जिल्हा कमिटीच्या वतीने ‘कौमी एकता रॅली’ काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

‘ईद’च्या पूर्वसंध्येला भव्य कौमी एकता रॅली
लातूर : ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बुधवारी लातुरात जिल्हा कमिटीच्या वतीने ‘कौमी एकता रॅली’ काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
न्यू काझी मोहल्ला भागातून निघालेली मोटारसायकल रॅली शाहू चौक, सम्राट चौक, गुळ मार्केट, गांधी चौक, शिवाजी चौक, नवा रेणापूर नाका, खोरी गल्ली, हनुमान चौक, सुभाष चौक, गंजगोलाई मार्गांवर काढण्यात आली. यावेळी हजारो दुचाकीस्वार रॅलीत सहभागी झाले होते. याप्रसंगी ईद-ए-मिलादुन्नबी कमिटीचे अध्यक्ष हाजी रहिम कादरी, उपाध्यक्ष सलिम घंटे, इस्माईल सय्यद, साजिद खान, रॅली प्रमुख अॅड. सर्फराज पठाण, इस्माईल फुलारी, इम्रान कुरेशी, खाजा पठाण, कलिम रजा कुरेशी, अफजल कुरेशी, उमरदराज खान, यासीन कच्छी, मैनोद्दीन शेख, सर्फराज मणियार, फकीर मिस्त्री, राजा मणियार, जमील नाना, नसीर फुलारी आदींची उपस्थिती होती.