ग्रामसेवकांची दांडी; शेतकर्यांची गैरसोय
By Admin | Updated: May 14, 2014 01:01 IST2014-05-14T00:59:34+5:302014-05-14T01:01:35+5:30
राजकुमार देशमुख ल्ल सेनगाव ग्रामीण भागाच्या ग्रामविकासाचा कणा म्हणून ग्रामसेवकांकडे पाहिले जाते.

ग्रामसेवकांची दांडी; शेतकर्यांची गैरसोय
राजकुमार देशमुख ल्ल सेनगाव ग्रामीण भागाच्या ग्रामविकासाचा कणा म्हणून ग्रामसेवकांकडे पाहिले जाते. अत्यंत महत्वाच्या असणार्या या यंत्रणेला तालुक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घरघर लागली असून, ग्रामसेवक महिना- पंधरा दिवस गावातच येत नसल्याचे चित्र तालुक्यातील बहुतांश गावांत काही महिन्यांपासून वाढले आहे. ग्रामीण भागातील गाव, वाडी, तांड्याचा प्रशासनाच्या वतीने विकास करण्याची जबाबदारी खर्या अर्थाने ग्रामसेवक यंत्रणेवर आहे. तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींकरिता ६६ ग्रामसेवक कार्यरत आहेत. ग्रामसेवकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात तीन विस्तार अधिकार्यांसह गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. असे असताना मुख्यालयाचे वावडे, परजिल्ह्यातून, जिल्ह्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत कारभार पाहणारी ग्रामसेवक यंत्रणा कमालीची ढिसाळ झाली आहे. सरासरी दोन ते तीन गावचा कारभार पाहण्यासाठी कार्यरत असणार्या ग्रामसेवकाला गावभेटीचे दिवस निश्चित करून दिले असताना ग्रामसेवक संबंधित गावामध्ये जात नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. परजिल्ह्यातून कारभार पाहणारी ग्रामसेवक मंडळी गावात महिना-महिना येत नसल्याच्या असंख्य तक्रारी पंचायत समिती पातळीवर वाढल्या आहेत. काही ग्रामसेवक महाशय केवळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच हजेरी लावतात व पुन्हा मासिक बैठकीच्या निमित्ताने वेळ मिळाला तर नेमून दिलेल्या गावात भेट देतात. सातत्याने गैरहजर राहणार्या ग्रामसेवकांचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे. ग्रामसेवक सर्रासपणे कोणतीही रजा न देता प्रदीर्घ काळ गैरहजर आहेत. या सर्वांचा त्रास सर्वसामान्य ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे, कायम गैरहजर राहणार्या ग्रामसेवकांचे वेतनही पंचायत समिती स्तरावरून विना अडथळा काढले जाते. त्यामुळे एकप्रकारे सातत्याने गैरहजर राहणार्या ग्रामसेवकांना पंचायत समिती प्रशासनच पाठबळ देत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच यंत्रणा ग्रामसेवकांच्या अनधिकृत गैरहजेरीला पाठबळ देऊन आपले हित जोपासण्यात धन्यता मानत आहे. या प्रकारामुळे सातत्याने गैरहजर राहणार्या ग्रामसेवकाचे मनोधेर्ये वाढले असून, त्यांना कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा वरिष्ठांची भीती राहिलेली नाही. या संदर्भात सेनगावचे प्रभारी गटविकास अधिकारी पंकज राठोड यांना विचारले असता, एखाद्या ग्रामसेवकाची पंचायत समितीकडे तक्रार आल्यास त्याची लगेच दखल घेण्यात आले. अनेकवेळा गैरहजर राहणार्या ग्रामसेवकांना नोटिसा पाठवून त्यांच्या वेतनकपात व प्रशासकीय कार्यवाहीचे प्रस्ताव जि.प.च्या पंचायत विभागाकडे पाठविण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.