ग्रामसेवक शिंदे आत्महत्या प्रकरणात बुधवारी चौकशी समिती दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:08 IST2021-02-05T04:08:12+5:302021-02-05T04:08:12+5:30
गटविकास अधिकाऱ्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून बिडकीन येथील ग्रामसेवक संजय शिंदे यांनी २० जानेवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली ...

ग्रामसेवक शिंदे आत्महत्या प्रकरणात बुधवारी चौकशी समिती दाखल
गटविकास अधिकाऱ्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून बिडकीन येथील ग्रामसेवक संजय शिंदे यांनी २० जानेवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. याबाबत आक्रमक झालेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय लोंढे, ग्रामविस्तार अधिकारी साळवे, ग्रामसेवक संघटनेचे पैठण तालुका प्रमुख सखाराम दिवटे व ग्रामसेवक पोतदार यांना जबाबदार धरून त्यांची चौकशी करण्याची मागणी जि. प. सीईओ डॉ. गोंदावले यांच्याकडे केली होती. दरम्यान, ग्रामविस्तार अधिकारी साळवे, ग्रामसेवक दिवटे व पोतदार यांना निलंबित करण्यात आले असून विजय लोंढे यांच्या निलंबनाची कार्यवाही जि. प. प्रशासनाने सुरू आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांच्या चौकशी समितीने बुधवारी पैठण पंचायत समिती कार्यालयात येऊन ग्रामसेवक व कार्यालयातील विविध कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले. सध्या वादग्रस्त गटविकास अधिकारी फरार आहेत.