एक वर्षापासून ग्रामसेवक गैरहजर

By Admin | Updated: May 19, 2014 00:16 IST2014-05-18T23:53:54+5:302014-05-19T00:16:09+5:30

परभणी : गंगाखेड तालुक्यातील रुमणा येथील ग्रामसेवक तब्बल एक वर्षापासून गैरहजर असल्याने अनेक कामे खोळंबली आहेत़

Gramsevak absent from one year | एक वर्षापासून ग्रामसेवक गैरहजर

एक वर्षापासून ग्रामसेवक गैरहजर

 परभणी : गंगाखेड तालुक्यातील रुमणा येथील ग्रामसेवक तब्बल एक वर्षापासून गैरहजर असल्याने अनेक कामे खोळंबली आहेत़ दरम्यान या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी तीन दिवसांत चौकशी अहवाल मागविला आहे़ रुमणा येथील ग्रामसेवक ग्रामपंचायतीत येत नाहीत़ ग्रामस्थ त्यांच्या प्रतीक्षेत आहेत़ १५ आॅगस्ट, २६ जानेवारी या दिवशीच्या ध्वजारोहनालाही ते गैरहजर होते़ ग्रामसेवक गैरहजर असल्याने गावातील कामे खोळंबली आहेत़ ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागते़ शौचालयाच्या बांधकामासाठी आलेला निधी कुठे आहे याचा पत्ता नाही़ या संदर्भात ग्रामस्थांनी गंगाखेडच्या गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली़ परंतु, त्यांनीही लक्ष दिले नाही़ त्यामुळे काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे ही तक्रार करण्यात आली़ त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी गटविकास अधिकार्‍यांना पत्र पाठवून या प्रकरणाची मुद्देनिहाय चौकशी करून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करावा, असे सूचित केले आहे़ ६ मे रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी हे पत्र दिले आहे़ एक आठवडा लोटला तरी गटविकास अधिकार्‍यांनी अद्याप हा अहवाल सादर केला नसल्याची तक्रार या ग्रामस्थांची आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Gramsevak absent from one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.