शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

धरणासाठी घर दिलेल्या ग्रामस्थाची खंडपीठात धाव

By admin | Updated: April 7, 2015 01:28 IST

औरंगाबाद : अंजना मध्यम प्रकल्पासाठी शासनाने पळशी बुद्रुक (ता. कन्नड) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच सुमारे तीनशे ते साडेतीनशे घरे संपादित केली होती. शासनाने संपादित जमिनीचा मावेजा दिला.

औरंगाबाद : अंजना मध्यम प्रकल्पासाठी शासनाने पळशी बुद्रुक (ता. कन्नड) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच सुमारे तीनशे ते साडेतीनशे घरे संपादित केली होती. शासनाने संपादित जमिनीचा मावेजा दिला. मात्र, ग्रामस्थांना त्यांच्या घराचे अनुदान अद्याप दिलेले नाही. त्यामुळे एका गावकऱ्याने खंडपीठात याचिका दाखल करून अनुदान देण्याचे निर्र्देश शासनाला द्यावेत, अशी विनंती केली आहे. याचिकाकर्ता छगन देवराव गायकवाड यांच्यासह सुमारे अडीचशे ते पावणेतीनशे लोकांची घरे आणि शेतजमीन अंजना मध्यम प्रकल्पासाठी १९९४ मध्ये शासनाने संपादित केली. शेतजमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना देण्यात आला. गावकऱ्यांचे चांगले पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या घरांच्या किमतीनुसार शासन त्यांना अनुदान देत असते. याचिकाकर्त्यांनी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांकडे अनुदान मिळावे, यासाठी अर्ज दाखल केला. त्यांनी शपथपत्रावर स्पष्ट नमूद केले की, कलम १८ नुसार शासनाकडे वाढीव मावेजासाठी अर्ज केलेला नाही. तसेच कलम २८ अ भूसंपादन कायद्याप्रमाणे कारवाई केलेली नाही. मात्र, अद्याप त्यांना पुनर्वसन अनुदान मिळालेले नाही. अधिकारी पुनर्वसन अनुदानाची रक्कम देण्यासंदर्भात टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे त्यांनी अ‍ॅड. प्रमोद कुलकर्णी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर २५ मार्च रोजी सुनावणी झाली असता, न्यायालयाने जिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी जायकवाडी प्रकल्प-१, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांना नोटीस बजावली आहे. याचिकेची सुनावणी २२ एप्रिल रोजी ठेवली आहे.