ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित

By Admin | Updated: September 19, 2014 00:59 IST2014-09-19T00:54:36+5:302014-09-19T00:59:49+5:30

उस्मानाबाद : राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त मुंबई यांनी माहे आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ८ तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका

Gram Panchayat election program declared | ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित


उस्मानाबाद : राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त मुंबई यांनी माहे आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ८ तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ४४ ग्रामपंचायतीच्या सुधारित पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, मुदती संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका उमरगा तालुक्यातील दालवमलिकवाडी, नाईकनगर (सु.), भूम तालुक्यातील पाठसांगवी, वाशी तालुक्यातील पारा आणि लोहारा तालुक्यातील कास्ती बु. या सर्व प्रवर्गातील सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत.
पोटनिवडणुकामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील कुमाळवाडी, प्रभाग क्र. २, गोवर्धनवाडी/थोडसरवाडी प्रभाग ३, गोपाळवाडी प्रभाग २, देवळाली प्रभाग ३, धारूर प्रभाग ३, दारफळ, वरवंटी, प्रत्येकी प्रभाग क्र. १ आणि तुगाव येथील प्रभाग २, तुळजापूर तालुक्यातील होर्टी प्रभाग ३, वडाचा तांडा प्रभाग ३, अणदूर प्रभाग ५, आणि अमृतवाडी प्रभाग १, उमरगा तालुक्यातील कदमापूर/दुधनाळ प्रभाग २ आणि जकेकूर प्रभाग ३, रामपूर प्रभाग २, दाबका प्रभाग १ व ३ नागराळ गुंजोटी प्रभाग क्र. १, २ कोरेगाववाडी प्रभाग २, लोहारा तालुक्यातील बेंडकाळ प्रभाग २, आरणी प्रभाग १, कमालपूर प्रभाग १, मोघा बु. प्रभाग ३, मुर्शदपूर प्रभाग१ मुर्शदपूर प्रभाग ३, चिंचोली रेबे प्रभाग १ व २, उदतपूर प्रभाग ३, एकोंडी लो. प्रभाग १, करजगाव प्रभाग २, सालेगाव प्रभाग ३, कळंब तालुक्यातील सातेफळ प्रभाग २, बोरगाव ध. प्रभाग ३, आणि भूम तालुक्यातील माळेवाडी प्रभाग १, माळेवाडी प्रभाग ३, बागलवाडी प्रभाग २, ३, उमाचीवाडी प्रभाग १, २, ३, वडाचीवाडी प्रभाग १, ३, नान्नजवाडी प्रभाग २, नान्नजवाडी प्रभाग २, दांडेगाव प्रभाग २, दांडेगाव प्रभाग २, चिंचपूर ढगे प्रभाग ३, आणि परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी प्रभाग २ व ३, घारगाव २, वाशी तालुक्यातील शेंडी प्रभाग २, शेंडी प्र. २, सोनेगाव प्रभाग १, २, जवळका प्रभाग २, ३, सारोळा वा. प्रभाग १, २, पिंपळवाडी प्रभाग १ व २, या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कालावधी संपत असल्याने सार्वत्रिक निवडणुका वरील प्रभागात घेण्यात येतील, असे कळविले आहे.
सुधारित कार्यक्रमही जाहीर
राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त यांनी माहे आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ग्रामपंचायतीच्या मुदती संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीत लेखनिकांच्या चुका किंवा दुसऱ्या प्रवर्गातील मतदार चुकून अंतर्गभूत झाले असल्यास अथवा अधिसृचित केलेल्या तारखेस विधानसभा मतदार यादीत नावे असूनही त्यांची नावे चुकून प्रभागनिहाय मतदार यादीत समाविष्ठ करावयाची राहून गेली असल्यास अथवा वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे यादीमधून वगळलेली नसल्यास त्यांची नावे पुरवणी यादीद्वारे समाविष्ठ कराव्यात अथवा वगळण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम मतदारयादी अधिप्रमाणित करून ही यादी २४ सप्टेंबर रोजी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)
मतदारयादी ग्राह्य धरण्याचा दिनांक ९ सप्टेंबर, मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम १९५९ मधील नियम ३ व पोटनियम ४ नुसार प्रारुप मतदार यादी लोकांच्या परिक्षणासाठी उपलब्ध करणे आणि हरकती व सूचना मागविण्याचा दिनांक १६ सप्टेंबर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम शनिवार दि. २० सप्टेंबर आणि मतदारयादीची जाहीर नोटीस प्रसिद्ध करणे व अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा बुधवार दि. २४ सप्टेंबर अशी असल्याची माहिती मुंबई राज्य निवडणूक आयोगाच्या सहायक आयुक्त पुनम शिरसोळकर यांनी दिली आहे.

Web Title: Gram Panchayat election program declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.