केजमध्ये धान्य माफिया मोकाट

By Admin | Published: July 31, 2014 12:16 AM2014-07-31T00:16:33+5:302014-07-31T00:42:36+5:30

केज : येथील शासकीय गोदामात राजरोस सुरु असलेल्या धान्याच्या काळाबाजाराचा ‘लोकमत’ने शुक्रवारी पर्दापाश केला होता

The grain mafia mokat in Cage | केजमध्ये धान्य माफिया मोकाट

केजमध्ये धान्य माफिया मोकाट

googlenewsNext

केज : येथील शासकीय गोदामात राजरोस सुरु असलेल्या धान्याच्या काळाबाजाराचा ‘लोकमत’ने शुक्रवारी पर्दापाश केला होता. या वृत्तानंतर तहसीलदार शरद झाडके यांनी गोदामाचा पंचनामा तर दूरच;पण रक्षकांना साधी विचारणाही केली नाही. त्यामुळे धान्यमाफिया मोकाटच आहेत.
केज येथील गोदामात तालुक्यातील रेशनदुकानांना पुरविण्यासाठी धान्य येते. धान्याचे पोते फाडून पाच किलोपर्यंतचे धान्य काढून घेतले जात असल्याचे ‘लोकमत’ स्टींग मधून समोर आले. ‘मापात पाप’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यावर तहसीलदार शरद झाडके यांनी एकूण धान्य, वाटप केलेले धान्य याची सविस्तर माहिती घेत पंचनामा करणे अपेक्षित होते.
मात्र, त्यांनी धान्यमाफियांची पाठराखण करत त्यांना जाब विचारण्याचीही तसदी घेतली नाही. प्रत्येक तहसीलदारास दहा टक्के रेशन दुकाने तपासण्याच्या सूचना आहेत. तहसीलदार शरद झाडके या तपासण्याही करत नाहीत, असा आरोप युवा लोकजनशकती पक्षाचे बीड शहराध्यक्ष अशोक गायकवाड यांनी केला. धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे रॅकेट सक्रिय आहे़ मात्र रेशन दुकानदार ते तहसीलदार या सर्वांचेच हात यात गुंतलेले असल्यामुळे कारवाईकडे डोळेझाक केली जात असल्याचे गायकवाड यांनी सांगितले़ धान्याचा घोटाळा करणाऱ्यांबरोबरच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे़
झाडके नॉट रिचेबल
यासंदर्भात तहसीलदार शरद झाडके यांच्याशी संपर्क झाला नाही. ते नॉट रिचेबल होते, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही. (वार्ताहर)
जिल्हाधिकारी म्हणाले, गय नाही
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, केजमध्ये असा काही प्रकार घडला असता तर मी माहिती घेतो़
कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही़
यापूर्वी चौसाळा, नेकनूर येथील गोदामात गैरप्रकार उघडकीस आले़ तेथे कारवाई केलेली आहे़
त्यामुळे कोणाचीही गय करणार नाही,असा इशारा त्यांनी दिला़
केज प्रकरणातील अहवाल मागवून कारवाईची दिशा ठरविण्यात येईल, असेही त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले़

Web Title: The grain mafia mokat in Cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.