पदवीधर मतदारसंघाची नोंदणी सुरू

By Admin | Updated: May 12, 2014 00:41 IST2014-05-12T00:16:47+5:302014-05-12T00:41:28+5:30

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या जुलैमध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी प्रशासनाने पदवीधर मतदारांची नोंदणी सुरू केली आहे.

Graduation Constituency Registration | पदवीधर मतदारसंघाची नोंदणी सुरू

पदवीधर मतदारसंघाची नोंदणी सुरू

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या जुलैमध्ये होणार्‍या निवडणुकीसाठी प्रशासनाने पदवीधर मतदारांची नोंदणी सुरू केली आहे. तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात मतदारांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांची मुदत १९ जुलै २०१४ रोजी संपत आहे. त्यामुळे या मतदारसंघात जुलै महिन्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. पदवीधर मतदारसंघात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. २००९ साली या मतदारसंघात २ लाख ७२ हजार मतदार होते. आता यात ९६ हजार मतदारांची भर पडली. सर्वाधिक ३४ हजार मतदार औरंगाबाद जिल्ह्यात वाढले आहेत. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात १४ हजार, जालना व परभणी जिल्ह्यांत प्रत्येकी ७ हजार, हिंगोली जिल्ह्यात २,५००, उस्मानाबाद जिल्ह्यात ९ हजार आणि नांदेड जिल्ह्यात १० हजार मतदार वाढले आहेत. निवडणुकीआधी पुन्हा एकदा राहिलेल्या पदवीधरांसाठी नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात चार दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत मतदार नोंदणीच्या सूचना सर्व जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयात ही नोंदणी केली जात आहे. निवडणुकीत विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूमिका पार पाडतील. विभागीय आयुक्तांनी उपायुक्त डॉ. विजय फड यांची नेमणूक केली आहे. मराठवाड्यातील मतदार जिल्हामतदार औरंगाबाद१ लाख ७ हजार २९ जालना२४ हजार ४४३ बीड५९ हजार ४७० परभणी३१ हजार २०२ हिंगोली११ हजार ३१६ उस्मानाबाद३९ हजार ८१४ लातूर५१ हजार ७७३ नांदेड४३ हजार ३३८ एकूण ३,६८ हजार ३८५

Web Title: Graduation Constituency Registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.