शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी दीक्षांत सोहळ्यास राज्यपाल येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 6:35 PM

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी राज्यपालांची निमंत्रण देण्यासाठी मंगळवारी भेट घेतली.

ठळक मुद्देराज्यपालांनी कुलगुरूंचे आमंत्रण स्वीकारलेहीरक महोत्सवी (६० वा) दीक्षांत सोहळा फेब्रुवारी महिन्यात

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी (६० वा) दीक्षांत सोहळा येत्या फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. या सोहळ्यास राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी परवानगी दिली. तसेच या सोहळ्याला कुलपती उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी राज्यपालांची निमंत्रण देण्यासाठी मंगळवारी भेट घेतली.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात मंगळवारी भेट घेतली.  यावेळी त्यांनी हीरक महोत्सवी दीक्षांत सोहळ्यास उपस्थित राहण्यासह मागील पाच महिन्यांत विद्यापीठात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी राज्यपालांनी विद्यापीठाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केल्याचे विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सवी दीक्षांत सोहळा २००९ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कार्यकाळात झाला होता. त्यानंतर हीरक महोत्सवी दीक्षांत सोहळ्याची तयारी परीक्षा विभागाने सुरू केली आहे. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या दीक्षांत सोहळ्यात आॅक्टोबर २०१८ आणि मार्च २०१९ या वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात येणार आहेत. पदव्युत्तर पदवीसाठी आवेदन मागविण्यात आले असल्याचेही प्रशासनाने कळविले आहे. तसेच पीएच.डी. पदवीसाठीही लवकरच अर्ज मागविण्यात येणार आहेत. तसेच या सोहळ्यासाठी पाहुणेही लवकरच ठरविण्यात येतील, अशी माहिती प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद