औरंगाबाद शहराचा कारभार निपुण विनायक यांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 16:32 IST2018-03-16T16:28:25+5:302018-03-16T16:32:05+5:30
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारचे उप सचिव निपुण विनायक यांची महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहराचा कारभार निपुण विनायक यांच्या हाती
औरंगाबाद : पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना काल सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषानेनंतर आज सकाळी वेगवान चक्र फिरत डी.एम. मुगळीकर यांची महानगरपालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आली. यावेळी आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारचे उप सचिव निपुण विनायक यांची महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
कचरा टाकण्यास विरोध करणार्या मिटमिट्यातील नागरिकांना झोडपून काढणार्या पोलिसी कारवाईचा फटका पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना बसला आहे. यानंतर आज सकाळी वेगवान हालचाली होत मिटमिट्यात कचरा नेण्याचे आदेश ज्या महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिले होते त्यांचीही बदली करण्यात आली. आज सकाळी औरंगाबाद येथील वैधानिक विकास महामंडळात त्यांच्या बदली आदेश आले. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पालिकेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. मात्र आता विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारचे उप सचिव निपुण विनायक यांची महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.