शौचालयांसाठी शासन देणार पंधरा हजार
By Admin | Updated: May 13, 2014 01:15 IST2014-05-12T23:15:28+5:302014-05-13T01:15:31+5:30
बीड : गावागावात स्वच्छता नांदावी यासाठी निर्मलग्राम, पाणंदमुक्ती यासारख्या योजना राबविण्यता आल्या़ आता या योजनांमध्ये आणखी एक भर पडली आहे़

शौचालयांसाठी शासन देणार पंधरा हजार
बीड : गावागावात स्वच्छता नांदावी यासाठी निर्मलग्राम, पाणंदमुक्ती यासारख्या योजना राबविण्यता आल्या़ आता या योजनांमध्ये आणखी एक भर पडली आहे़ अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या दारापुढे शौचालय बांधण्यासाठी शासनच १५ हजार रुपये मोजणार आहे़ त्यामुळे गोरगरिबांची कुचंबणा थांबणार आहे़ जिल्ह्यात या नव्या योजनेचा १२२८ जणांना लाभ होणार आहे़ राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्ह्यासाठी एक कोटी ८४ लाख रुपये इतका निधी जिल्हा परिषदेला सोमवारी प्राप्त झाला आहे़ ‘सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलितवस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना’ असे या योजनेचे नाव आहे़ या योजनेंतर्गत अनुसूचित जाती- जमाती व नवबौद्ध घटकांना लाभ मिळणार आहे़ दलित वस्त्यांमध्ये शौचालयाअभावी रोगराई पसरत असून महिलांची कुचंबणा होते़ त्यामुळे ही योजना अतिशय महत्त्वाची माली जात आहे़ वैयक्तिक लाभाच्या या योजनेचा यावर्षी १२२८ जणांना लाभ भेटणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आऱ डी़ वहाने यांनी सांगितले़ प्रस्ताव मागविले योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले आहेत़ त्याची पंचायत विभागाकडून छाननी करण्यात येईल़ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न आहेत, असेही वहाने म्हाणाले़ काय आहेत अटी? जातप्रमाणपत्र, ८ अ उतारा, यापूर्वी शौचालय योजनेचा फायदा न घेतल्याचे शपथपत्र या अटींची पूर्तता करावी लागणार आहे. ११ हजार शौचालय बांधकामासाठी तर ४ हजार रुपये नळ जोडणीसाठी मिळणार आहेत. (प्रतिनिधी)