शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वचनपूर्ती न करणारे सरकार छत्रपती संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाला जबाबदार: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 19:38 IST

पाणी प्रश्नांवर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगा; शिंदेसेना आणि भाजपवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

छत्रपती संभाजीनगर: शहरात पाणी प्रश्न भीषण झालेला आहे, याला कोणत्याही वचनांची पूर्तता न करणारे सरकार जबाबदार आहे, हे सरकारी अपयश आहे, असा हल्लाबोल ठाकरेसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. या सरकारने अनेक वचने दिले, पण त्याची पूर्तता केली नाही. राज्यात नागरिक, शेतकरी, महिला सर्वांवर अन्याय वाढत आहे. मात्र, सरकारकडून कोणतीही वचनपूर्ती होत नाही. पाणी प्रश्नांवर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी थोडी तरी लाज बाळगावी, अशी सडेतोड टीकाही त्यांनी शिंदेसेना आणि भाजपवर यावेळी केली. ते ठाकरेसेनेच्या लबाडांनो पाणी द्या या शहर पाणी प्रश्नावरील आंदोलनाच्या समारोपात मोर्चासाठी शहरात आले होते.

मागील महिनाभरापासून शहर पाणीप्रश्नावर ठाकरेसेनेचे लबाडांनो पाणी द्या हे आंदोलन सुरू आहे. शहरातील विविध भागात कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पाणी प्रश्नावर संताप व्यक्त केला. या आंदोलनांचा समारोप आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज महापालिकेवर हल्लाबोल माेर्चा नेऊन होत आहे. क्रांती चौकातून सायंकाळी मोर्चास सुरुवात झाली. लबाडांनो पाणी द्या, असे बॅनर हातात घेऊन काही आंदोलक सहभागी होते. माजी मंत्री आदित्य ठाकरे, विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेकडे रवाना झाले.

१६८० कोटींची योजना २७४० कोटींची कशी झालीनवीन पाणी पुरवठा योजना १६८० कोटी रुपयांची होती. नंतर ती २७४०कोटी रुपयांची कशी झाली, असा सवाल आ. अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा मार्गी लागलेले काम आता अत्यंत संथगतीने चालू आहे. या योजनेचे काम ३ फेब्रुवारी २०२४ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सत्ताधाऱ्याचा वचक नसल्याने योजनेचे काम दोन वर्ष पूर्ण होऊ शकत नसल्याचे आ.दानवे यांनी नमूद केले.

ठाकरेसेनेवर भाजपचा पलटवारठाकरे गट सोंग करीत असून मोर्चाचे ढोंग करीत आहे. मनपात सत्तेत असताना सर्वाधिक महापौर त्यांचे राहिले. त्यांच्या काळात पाणीपुरवठ्याचे वाटोळे होण्यासह अनेक योजनांचा बट्ट्याबोळ झाला. त्यामुळे खरी लबाडी ठाकरे गटाने केल्याची टीका भाजपचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, माजी महापौर बापू घडमोडे यांनी केला.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरwater shortageपाणीकपात