शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

सरकार खरंच विचित्र निर्णय घेतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:48 IST

सध्याचे सरकार खरोखरच विचित्र निर्णय घेत असल्याने शेतकºयांना तर अनेक अडचणीला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे आता शेती अस्तीत्वाचीही भीती निर्माण झाल्याने तेवढीतरी वाचविण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती ‘शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचे’ राज्य निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्याचे सरकार खरोखरच विचित्र निर्णय घेत असल्याने शेतकºयांना तर अनेक अडचणीला तोंड द्यावेच लागते. त्यामुळे आता शेती अस्तीत्वाचीही भीती निर्माण झाल्याने तेवढीतरी वाचविण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती ‘शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाचे’ राज्य निमंत्रक शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.हिंगोलीतील शासकीय विश्राम गृह येथे १६ आॅगस्ट रोजी किसान मंत्र कार्यकारी समितीची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कार्यकारी समिती सदस्य दत्ता पवार, आ. रामराव वडकुते, रा. कॉ. अध्यक्ष मुनिर पटेल यांची उपस्थिती होती. किसन मंच कार्यकारी समिती महाराष्टÑ च्या वतीने शेतकºयांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी, शेतमजूर सुरक्षाअभियान राबविण्यात येत असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. हे अभियान ५५ दिवसांचे असून यात एकूण ८ प्रकारच्या मागण्यांचा समावेश आहे. आज घडीला वारंवार सरकार निर्णय घेत असल्याने या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांचे आतोनात नुकसान होत चालले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. कुठल्याही अटी व निकष न लावता सन २०१७ पर्यंतच्या शेतकºयांना कर्जातून मुक्त करावे. तर राज्याच्या व केंद्राच्या शेतीमालाला भाव ठरविणाºया समितीला घटनात्मक अधिकार देऊन शेतीमालाला कायद्याप्रमाणे योग्य भावाची हमी द्यावी, शिवाय शेतकºयांनाही व्यवसायिकाप्रमाणे तारण जमिनीच्या मुल्यांकनाच्या ७० टक्के एवढे कर्ज उपलब्ध करुन द्यावे आदी मागण्यासाठी हे अभियान राबविले जात असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. ९ आॅगस्ट पासून अभियानास प्रारंभ झाला असून, राज्यातील ३० जिल्ह्यात फिरुन २ आॅक्टोबर रोजी सरकारच्या विरोधात असहकार आंदोलनानंतर समारोप केला जाणार आहे.