शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांमध्येच झाडांची वानवा

By admin | Updated: June 5, 2016 00:47 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद पर्यावरण संवर्धनात झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच सरकारकडून दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला जातो.

सुनील कच्छवे, औरंगाबादपर्यावरण संवर्धनात झाडांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच सरकारकडून दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला जातो. मात्र, खुद्द हा कार्यक्रम राबविणारी आणि त्याबाबत सर्वसामान्यांना उपदेश देणारी सरकारी कार्यालयेच वृक्षारोपणाविषयी उदासीन आहेत. शहरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये अगदी विस्तीर्ण परिसर असूनही बोटावर मोजण्याइतकीच झाडे उभी आहेत. तर काही कार्यालयांत चक्क एकही झाड नसल्याचे आढळून आले.जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतने शहरातील काही सरकारी कार्यालयांचे सर्वेक्षण केले. यामध्ये तेथील झाडे आणि त्यांची परिस्थिती याची माहिती जाणून घेण्यात आली. तेव्हा वृक्षारोपणाविषयी फारसे काम झालेले नसल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, महानगरपालिका, तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग, मनपाची काही वॉर्ड कार्यालये आदी ठिकाणी किती झाडे आहेत याची पाहणी करण्यात आली. वृक्षारोपणाची जबाबदारी ज्या सामाजिक वनीकरण खात्यावर आहे, त्या खात्याच्या शहरातील दोन्ही कार्यालयांमध्ये एकही झाड नाही. जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरावरची ही दोन कार्यालये आहेत. मात्र, ही दोन्ही कार्यालये भाड्याच्या छोट्याशा इमारतीत आहेत. त्यामुळे या कार्यालयात एकही झाड नाही. तहसील कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. तालुक्याचे मुख्य कार्यालय असलेल्या तहसील कार्यालयातही अगदी वानगी दाखल एकही झाड नाही. त्यामुळे इथे नागरिकांना शोधूनही झाडाची सावली मिळत नाही. तर उपविभागीय कार्यालयात तीन-चार झाडे उभी आहेत. किती तरी एकरांमध्ये पसरलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अवघी सहा झाडे आहेत. तर कार्यालयाच्या संरक्षक भिंतीबाहेर रस्त्यालगत पाच झाडे उभी आहेत. संपूर्ण शहराचा भार वाहणारी महानगरपालिकाही वृक्षारोपणाविषयी फारशी जागरूक नाही. महानगरपालिका मुख्यालयाच्या दोन्ही इमारतीत मिळून अगदी २० ते २२ झाडे आहेत. या इमारतीचा विस्तीर्ण परिसर पाहता ही संख्या अगदी नगण्य स्वरुपाची आहे. ग्रामीण भागाची धुरा सांभाळणाऱ्या आणि मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील चित्रही उदासीनता दर्शविणारेच आहे. जिल्हा परिषद मुख्यालयाच्या सुमारे दहा एकर जागेत अवघी ४० ते ४५ झाडेच शिल्लक आहेत.