शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशावरून इंग्रजी शाळांची शासनाकडून मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:28 IST

‘आरटीई’ कायद्यानुसार मागासवर्गीय व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्याची सक्ती करण्यात आली; परंतु मागील सहा वर्षांपासून शैक्षणिक शुल्क परताव्याची तुटपुंजी रक्कम देऊन शाळांची मनधरणी केली जात आहे.

ठळक मुद्देआरटीई कायद्यांतर्गत विनाअनुदानित नामांकित  शाळांमध्ये २५ टक्के  जागांवर आॅनलाईन प्रवेश दिला जात आहे. २५ टक्के जागांवर प्रवेश देणार्‍या शाळांना शासनाकडून दरवर्षी शुल्क परतावा मिळणे अपेक्षित होते. परंतु अद्यापपर्यंत शाळांना शुल्क परताव्याची संपूर्ण रक्कम मिळालेली नाही. 

औरंगाबाद : ‘आरटीई’ कायद्यानुसार मागासवर्गीय व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश देण्याची सक्ती करण्यात आली; परंतु मागील सहा वर्षांपासून शैक्षणिक शुल्क परताव्याची तुटपुंजी रक्कम देऊन शाळांची मनधरणी केली जात आहे. या वेळी देखील २०१५-१६ या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक शुल्क परताव्याचा २ कोटी ९० लाख रुपयांचा निधी प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार २०१३ पासून दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई कायद्यांतर्गत विनाअनुदानित नामांकित  शाळांमध्ये २५ टक्के  जागांवर आॅनलाईन प्रवेश दिला जात आहे. २५ टक्के जागांवर प्रवेश देणार्‍या शाळांना शासनाकडून दरवर्षी शुल्क परतावा मिळणे अपेक्षित होते. परंतु अद्यापपर्यंत शाळांना शुल्क परताव्याची संपूर्ण रक्कम मिळालेली नाही. 

या संदर्भात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल टीचर्स असोसिएशनचे (मेस्टा) प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील इंग्रजी शाळांना अपेक्षित शुल्क परताव्याची जवळपास १२ कोटी रुपयांची रक्कम शासनाकडे थकली आहे. राज्यातील शाळांची ही रक्कम एकूण ६०० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. शुल्क परताव्याची रक्कम मिळण्यासाठी ‘मेस्टा’च्या वतीने डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनावर मोर्चाही नेण्यात आला होता. या महिन्यात २५ टक्के प्रवेशासाठी शाळांच्या नोंदणीसंबंधी शिक्षण विभागाने आयोजित केलेली मुख्याध्यापकांची बैठकही याच मागणीसाठी उधळण्यात आली होती.

‘आरटीई’ कायद्यांतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेशाला आमचा विरोध नाही. आम्ही या कायद्याचा सन्मानच करतो. पण, शासनाने आमची थट्टा करू नये. शाळा चालविण्यासाठी संस्थाचालकांना अनेक अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. त्या अनुषंगाने शाळांना वीज व मालमत्ता करात सवलत देण्यात यावी, स्कू ल बसेसना रोड टॅक्सव्यतिरिक्त अन्य कर लागू करण्यात येऊ नये, इंग्रजी शाळांना फी रेग्युलेशन कायदा लागू करण्यात यावा, इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही पोषण आहार सुरू करण्यात यावा, इंग्रजी शाळांना स्थलांतराची परवानगी देण्यात यावी, या मागण्यांचा शासनाने विचार केला पाहिजे, असेही शिंदे म्हणाले.

तपासणीनंतर देणार निधीया संदर्भात जि. प. शिक्षण विभागाकडून शाळांचे दप्तर तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. शिक्षण विस्तार अधिकार्‍यांमार्फत शाळांमध्ये जाऊन २०१३-१४ मध्ये आरटीई प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर संबंधित शाळांकडून शुल्क परताव्याची बिले मागविली जातील. बिलांची छाननी करून नंतर शुल्क परताव्याचा निधी वितरित केला जाणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळाzpजिल्हा परिषदSchoolशाळा