वाळूज महानगर : बजाजनगर येथे गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी घटना घडली. तीन उन्मादी तरुणांनी तलवारी व दांडा घेऊन रस्त्यावर धिंगाणा घातला. काही मिनिटांतच परिसरात भीतीचे सावट पसरले. तलवारी उगारत नागरिकांवर धाव घेतल्याने बाजारपेठ, चौक व रस्त्यांवर प्रचंड पळापळ झाली. दुकानदारांनी शटर खाली घेतले. नागरिक जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाणी धाव घेत होते. या उन्मादात दोघे जखमी झाले.
मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये सुरू असलेल्या बुग्गीवर किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका चिघळला की काही वेळांतच एकाच दुचाकीवरून ३ तरुण घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या हातात दोन तलवारी आणि एक लाकडी दांडा होता. शिवीगाळ करत त्यांनी आधी मार्केट परिसरात गोंधळ घातला. उगारलेल्या तलवारी पाहून ग्राहक व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी दुकानात लपण्यासाठी धाव घेतली. यानंतर हे तिघे दुचाकीवरून बजाजनगरातील विविध भागांत फिरू लागले.
एक दुचाकीस्वार बालंबाल बचावलामहाराणा प्रताप चौकात तर परिस्थिती अधिकच गंभीर झाली. येथिल चार ते पाच दुचाकींवर तलवारीचे सपासप वार करून नुकसान करण्यात आले. याच ठिकाणी एका नागरिकाच्या पाठीवर तलवारीचा वार करण्यात आल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत कोसळला. आणखी एका व्यक्तीवरही हल्ला करण्यात आला असून, त्याची ओळख अद्याप समोर आलेली नाही. दुचाकीवरून जाणाऱ्या एका नागरिकावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या व्यक्तीचे मुंडके उडवण्याच्या उद्देशाने तलवार चालवण्यात आली; मात्र, तो नागरिक थोडक्यात बचावला. हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. फुटेज पाहूनही अंगावर काटा उभा राहतो. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा मागोवा घेत वडगाव परिसरात पाठलाग करण्यात आला.
पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसारघटनेनंतर पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. वडगाव परिसरात आरोपींनी दुचाकी आणि तलवारी रस्त्यातच टाकून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पोलिसांनी दोन तलवारी, एक लाकडी दांडा आणि दुचाकी जप्त केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.
प्रताप चौक ठरतोय गुंडगिरीचे केंद्रमहाराणा प्रताप चौक व मीनाताई ठाकरे मार्केट परिसरात यापूर्वीही चाकूहल्ले, मारहाण, छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी याच भागात स्कॉर्पिओतून आलेल्या आरोपींनी सिनेस्टाईल हल्ला चढवत चाकूने वार व गोळीबाराचा प्रयत्न केला होता. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे हा परिसर गुंडगिरीचे केंद्र बनत असल्याचा आरोप होत आहे.
चिकार अवैध दारू अड्डेया परिसरात तात्पुरत्या आडोशाखाली अवैधरीत्या दारूचे अड्डे सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या अड्ड्यांवर तत्काळ कारवाई झाली नाही तर गुन्हेगारी आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शस्त्रबंदी कायदा कोणासाठी?गुन्हेगार खुलेआम तलवारी, चाकू घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र बजाजनगरात नेहमीचे झाले आहे. शस्त्रबंदी कायदा अस्तित्वात असतानाही अशा प्रकारे हत्यारे कशी आणि कुठून येतात, हा प्रश्न आहे.
सीसीटीव्हीत कैद थरारमीनाताई ठाकरे मार्केट, महाराणा प्रताप चौक आणि परिसरातील रस्त्यांवर घडलेला थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये आरोपी उघड्या तलवारी उगारत नागरिकांवर धावताना आढळले.
Web Summary : Three youths with swords terrorized Bajajnagar, attacking citizens and damaging vehicles. Two people were injured in the chaos. Police seized weapons and a motorcycle after the suspects fled, raising concerns about rising crime and illegal liquor dens in the area.
Web Summary : बजाजनगर, छत्रपति संभाजीनगर में तीन युवकों ने तलवारों से हमला कर आतंक मचाया। नागरिकों पर हमला किया और वाहनों को क्षतिग्रस्त किया। दो लोग घायल हुए। पुलिस ने हथियार और मोटरसाइकिल जब्त कर ली है, और आरोपियों की तलाश जारी है। इलाके में बढ़ते अपराध और अवैध शराब अड्डों पर चिंता जताई जा रही है।