‘लोकमत’ बालविकास मंचच्या चित्रकला स्पर्धेला चांगला प्रतिसाद
By Admin | Updated: May 22, 2014 00:30 IST2014-05-22T00:20:18+5:302014-05-22T00:30:10+5:30
नांदेड : ‘लोकमत’ बालविकास मंच व एस.जी.एम. विद्यालयाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

‘लोकमत’ बालविकास मंचच्या चित्रकला स्पर्धेला चांगला प्रतिसाद
नांदेड : ‘लोकमत’ बालविकास मंच व एस.जी.एम. विद्यालयाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. २० मे रोजी सायंकाळी ५ वाजता एस.जी.एम. विद्यालयात ह्या स्पर्धा घेण्यात आल्या. पहिली ते पाचवी गटासाठी ‘बागेत खेळणारी मुले’ तर सहावी ते दहावी गटातील विद्यार्थ्यांसाठी ‘सर्कसमधील दृश्य’ हा विषय देण्यात आला होता. पहिल्या गटात प्रथम क्रमांक अक्षदा संदीप परळकर हिने, द्वितीय क्रमांक- चरणप्रीतसिंह शिलेदार तर तृतीय क्रमांक अन्वयी डोईफोडे हिने मिळविला. मोठ्या गटात प्रथम समीर शेख जिलाणी, द्वितीय- प्रियंका रमेश थोरात तर तृतीय क्रमांक ईशा सुरेश कदम हिने मिळविला. बक्षीस समारंभ कार्यक्रमास एस.जी.एम. विद्यालयाचे संचालक विजय पेटकर उपस्थित होते. परीक्षक म्हणून अशोक कंधारकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)