शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

पर्यटकांसाठी खुशखबर!...आता अंधारात अधिक तेजाळणार 'दख्खनका ताज' अन् परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 14:11 IST

बीबी का मकबरा अन् परिसरातील कलाकुसर अंधारल्यावरही पाहता येणार

- योगेश पायघनऔरंगाबाद : बीबी का मकबऱ्यात सायंकाळी केवळ मुख्य इमारतीवर केवळ चारही बाजूंनी दिव्यांचा उजेड असतो. त्यामुळे सायंकाळी आलेल्या पर्यटकांना मकबरा बारकाईने पाहता येत नाही. त्यासाठी आता मकबऱ्यातील प्रत्येक कलाकुसरीवर दिव्यांनी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून त्यामुळे रात्री दहा वाजेपर्यंत मकबरा परिसर रात्रीच्या वेळीही विद्युत रोषणाईने न्हाऊन निघालेला पर्यटकांना बघता येणार असल्याचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) कडून सांगण्यात आले.

मकबऱ्यासमोर ११ एकरांत पुरातत्त्व विभागाला उद्यान विकसित करायचे आहे. त्यासाठी सध्याच्या पार्किंगच्या बाजूने जाणारा २४ मीटरचा रस्ता वळवून लेणीकडे पुढे नेण्याचा प्रस्ताव मनपाकडे दिला आहे. आवश्यकता भासल्यास आणखी २ मीटर जागा ‘एएसआय’ देईल. मात्र त्यापेक्षा अधिक जागा देणे शक्य होणार नाही. असे झाल्यास निर्माण होणाऱ्या ११ एकरच्या उद्यानात वाॅकिंग ट्रॅक, उद्यानासह पर्यटकांना सोयीसुविधा असतील. या परिसरातील दोन ते तीन एकरमधील अतिक्रमण आहे. ते हटवल्यास त्या जागेवर दिल्ली, भाेपाळच्या धर्तीवर हाट, ओपन ॲम्फी थिएटर उभारल्यास मकबरा परिसर शहरातील आकर्षणाचे व विरंगुळ्याचे केंद्र होईल. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि मनपाकडून सहकार्य अपेक्षित आहे. या उद्यानासाठी काॅस्मो फिल्म्सकडून उद्यान विकासासाठी तर उद्यानाच्या देखभालीसाठी व्हेराॅक कंपनी सहकार्यासाठी तयार असल्याचे अधीक्षक मिलन कुमार चावले यांनी लोकमतला सांगितले. ८४ एकर जागा भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नावावर झाली. ती जागा मोजून मार्किंग करून देण्याची मागणी एएसआयकडून करण्यात आली.

मिनारांचे होणार संवर्धन प्रस्तावितमकबऱ्यातील मिनारांच्या प्लॅस्टरच्या खपल्या अनेक ठिकाणी पडल्या आहेत. तर काही मिनारचे भाग काळवंडले आहेत. मकबऱ्यातील संगमरवरी जाळ्या अनेक ठिकाणी तुटलेल्या असून त्यांच्या वैज्ञानिक संवर्धनासाठीची कामे पुढील वर्षात प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्याला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडून मान्यता मिळताच संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

कलाकुसर रात्रीही पर्यटकांना दिसेल...विद्युत रोषणाई करण्यासाठी अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली. निविदा प्रक्रिया सुरु करण्यात परवानगी दिली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन दिवे लावण्याचे काम मार्च महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे सायंकाळी आलेल्या पर्यटकांनाही लख्ख प्रकाशात मकबऱ्यातील प्रत्येक भागातील कलाकुसर बघता येईल.-डाॅ. मिलन कुमार चावले, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, औरंगाबाद मंडळ

टॅग्स :Bibi-ka-Maqbaraबीबी का मकबराAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन