शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना आनंदाची बातमी; खासगी शाळेच्या गणवेशात नाही बदल, भावही स्थिर

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 16, 2024 11:10 IST

खासगी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गणवेश सक्तीचा केला जातो.

छत्रपती संभाजीनगर : खासगी शाळांनी यंदा विद्यार्थ्यांच्या गणवेशात बदल केला नाही. एवढेच नव्हे, तर गणवेशाच्या किमतीही मागील वर्षीप्रमाणेच स्थिर ठेवल्या आहेत. यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी पालकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

खासगी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गणवेश सक्तीचा केला जातो. गणवेश वितरक रोमी छाबडा यांनी सांगितले की, खासगी शाळांनी यंदा गणवेशात बदल केला नाही. मागील वर्षाप्रमाणेच यंदा भाव स्थिर आहेत. कोरोना काळानंतर शालेय शाळा सुरू झाल्या तेव्हा नवीन गणवेशांचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, आता तशी परिस्थिती नाही. यामुळे स्टेट बोर्ड, सीबीएसई पॅटर्नच्या खासगी शाळांमधील गणवेश यंदा वेळेआधी उपलब्ध होतील. गणवेश मुबलक प्रमाणात असून, कोणताही तुटवडा जाणवणार नाही.

कुठे शिवले जातात शालेय गणवेशशहरातील मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे ३०पेक्षा अधिक लहान-मोठे वितरक आहेत. सोलापूर, पुणे येथील युनिटमधून शालेय गणवेश शिवून घेतला जातो. तसेच कर्नाटक राज्यातील बिल्लोरी येथेही आता गणवेशाची शिलाई होत असून, तिथे फुल पँट व हाफ पँट शिवली जात आहे.

खासगी शाळा इंग्रजी माध्यम गणवेशाचे सर्वसाधारण दर शालेय गणवेशइयत्ता             दरइयत्ता ५ वी ते ७ वी ७००-८५० रु. इयत्ता ८ वी ते १० वी ८००- ८५० रु. --------खेळाचा गणवेशइयत्ता ५ वी ते ७ वी ६००- ७५० रु. इयत्ता ८ वी ते १० वी ७५०-८०० रु. ----------------मुलींचे जॅकेट -३५०-७०० रु. मुलांचे ब्लेझर - ९००- १५०० रु. ----------- मुुलींचे स्कर्ट ४५०-६५० रु. 

चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेसनर्सरी, केजीतील विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश, पण रंगीत आले आहेत. यात रंगीत टी-शर्ट व जीन्सच्या हाफ पँटचा समावेश असतो. ५०० ते ६०० रुपयांत हा गणवेश मिळतो.

४० टक्के विद्यार्थी घेतात नवीन गणवेशगणवेशात कोणताही बदल नसल्याने ४० टक्के विद्यार्थी नवीन गणवेश खरेदी करतात. बाकी कोणाचा शर्ट तर कोणाची पँट खराब झाला असेल तर तेवढचे खरेदी करतात. शहरात दीड लाख विद्यार्थी आहेत. गणवेश विक्रीत सुमारे १५ ते २० कोटींची उलाढाल होते, अशी माहिती गणवेश वितरकांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSchoolशाळाEducationशिक्षण