खुशखबर ! औरंगाबादची एप्रिलमध्ये वाढणार रेल्वे कनेक्टिव्हिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 11:52 AM2021-02-24T11:52:44+5:302021-02-24T11:55:51+5:30

दक्षिण मध्य रेल्वेकडून एप्रिल महिन्यात विविध रेल्वे सुरू केल्या जात आहेत.

Good news! Aurangabad's railway connectivity to increase in April | खुशखबर ! औरंगाबादची एप्रिलमध्ये वाढणार रेल्वे कनेक्टिव्हिटी

खुशखबर ! औरंगाबादची एप्रिलमध्ये वाढणार रेल्वे कनेक्टिव्हिटी

googlenewsNext

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेकडून एप्रिल महिन्यात विविध रेल्वे सुरू केल्या जात आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीत वाढ होणार आहे.

नांदेड ते निझामुद्दीन (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस ६ एप्रिलपासून नांदेड येथून दर मंगळवारी सकाळी ९ वाजता सुटेल आणि औरंगाबाद, मनमाड, भोपाल, झांसी, आग्रामार्गे निझामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल. निझामुद्दीन ते नांदेड (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस ७ एप्रिलपासून निझामुद्दीन येथून दर बुधवारी धावेल. नांदेड ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शुक्रवारी) ही रेल्वे २ एप्रिलपासून नांदेड येथून सकाळी ११.५० वाजता सुटेल आणि परभणीमार्गे औरंगाबाद येथे सायंकाळी ४.५० वाजता पोहोचेल.

औरंगाबाद ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर सोमवारी) ही रेल्वे ५ एप्रिलपासून औरंगाबाद येथून रात्री १.०५ वाजता सुटेल आणि परभणीमार्गे नांदेड येथे सकाळी ६.१५ वाजता पोहोचेल. औरंगाबाद ते रेनीगुंटा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शुक्रवारी) २ एप्रिलपासून औरंगाबाद येथून रात्री ८.५० वाजता सुटेल आणि परभणी, विकाराबाद, रायचूर, गुंटकळमार्गे रेनीगुंटा येथे सायंकाळी ७ वाजता पोहोचेल.

रेनीगुंटा ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शनिवारी) ३ एप्रिलपासून रेनीगुंटा येथून धावेल.

Web Title: Good news! Aurangabad's railway connectivity to increase in April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.