खुशखबर ! औरंगाबादेत आणखी ८ जणांचा कोरोनावर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 13:31 IST2020-05-10T13:31:03+5:302020-05-10T13:31:59+5:30
शहरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ७३ झाली आहे.

खुशखबर ! औरंगाबादेत आणखी ८ जणांचा कोरोनावर विजय
ठळक मुद्देशनिवारी 35 जण झाले होते कोरोनामुक्त
औरंगाबाद : औरंगाबादेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आणखी ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
औरंगाबादमध्ये शनिवारी एकाच दिवशी ३५ जण कोरोनामुक्त झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी आणखी ८ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. शहरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ७३ झाली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, उपचारामुळे रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याने दिलासा मिळत आहे.