‘लोकमत समाचार’तर्फे १९ रोजी सुदृढ बालक स्पर्धा
By Admin | Updated: November 14, 2014 00:55 IST2014-11-14T00:42:36+5:302014-11-14T00:55:32+5:30
औरंगाबाद : बालदिनाचे औचित्य साधून लोकमत समाचारतर्फे १९ नोव्हेंबर रोजी सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘लोकमत समाचार’तर्फे १९ रोजी सुदृढ बालक स्पर्धा
औरंगाबाद : बालदिनाचे औचित्य साधून लोकमत समाचारतर्फे १९ नोव्हेंबर रोजी सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अ. भा. बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या सहकार्याने आणि जॉन्सन बेबी प्रायोजित ही स्पर्धा तीन गटांत होणार आहे. लोकमत भवन येथे आयोजित करण्यात आलेली स्पर्धा शून्य ते १ वर्षे, १ ते ३ वर्षे आणि ३ ते ५ वर्षे अशा तीन वयोगटांत विभागली आहे. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र बक्षिसे असतील. बालकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांची देखभाल आणि संगोपन योग्य प्रकारे झाले पाहिजे, यासाठी जागृती करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बालकांचे संगोपन करताना मातांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बालरोगतज्ज्ञांच्या माध्यमातून यावर उपाय शोधण्यासाठी लोकमत समाचारतर्फे सलग तीन वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जन्म प्रमाणपत्र किंवा लसीकरण कार्ड वयाचा पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी ९५५२५६४५६० या मोबाईल क्रमांकावर चंचल जोशी यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांच्या औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष डॉ. जयंत तुपकरी, सचिव डॉ. गणेश कुलकर्णी, डॉ. राजेंद्र गांधी, डॉ. दत्ता कदम, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. वैद्य, डॉ. व्ही.के. कदम यांनी केले आहे.