शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

संघाचा जानेवारीत महासंगम

By admin | Updated: December 25, 2014 00:46 IST

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने औरंगाबादेत पहिल्यांदाच ‘देवगिरी महासंगम’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने औरंगाबादेत पहिल्यांदाच ‘देवगिरी महासंगम’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ११ जानेवारी २०१५ रोजी आयोजित या महासंगमात ११ जिल्ह्यांतील ३० हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक हजर राहणार आहेत. १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. पुढील वर्षी संघ ९० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत ‘देवगिरी महासंगम’ शिबीर घेण्यात येणार आहे. यासाठी बीड बायपास रोडवरील बाळापूर शिवार येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जागेवर शिबीर होणार आहे. सुमारे ९५ एकर जागेवर या महासंगमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील ८ व खान्देशातील ३, असे ११ जिल्ह्यांतील ३० हजार स्वयंसेवक एकत्र येत आहेत. या सोहळ्याचे नियोजन मागील दीड वर्षापासून सुरू आहे. मैदानावर मंडप उभारण्याचे काम ३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. येथील मैदानाला धर्मवीर संभाजी महाराज नगरी, असे नाव देण्यात आले आहे. मैदानात निवासासाठी १५ एकरांवर १५ कक्ष उभारण्यात येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे. चार मोठ्या जिल्ह्यांसाठी दोन कक्ष असणार आहेत. प्रत्येक निवासी कक्षाच्या बाजूला एक स्वयंपाकगृह उभारण्यात येत आहे. याशिवाय मुख्य कार्यक्रमासाठी ४० एकर जागेवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अंतर्गत रस्त्यासाठी ७ ते ८ एकराची जागा सोडण्यात आली आहे. १० एकर जागेवर पार्किंग करण्यात येणार आहे. याशिवाय चार मिनी दवाखाने, अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था असणार आहे. ५ जानेवारीपर्यंत मंडप उभारणीचे काम पूर्ण होईल, यासाठी २२ समित्या तयार करण्यात आल्या आहेत. याद्वारे ६०० स्वयंसेवक संपूर्ण व्यवस्था करीत आहेत, अशी माहिती आखणीप्रमुख जगन्नाथ गुळवे यांनी दिली. ११ जानेवारी रोजी आयोजित देवगिरी महासंगम सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुख्य सोहळा सायंकाळी ५.३० वाजता सुरू होणार आहे. तत्पूर्वी, दुपारी १२ वाजेपर्यंत ११ जिल्ह्यांतील ३० हजार स्वयंसेवक मैदानात दाखल होणार आहेत. २ ते ३.३० वाजेदरम्यान जिल्हानिहाय सत्र होणार आहेत. ४.३० वाजता संघाच्या गणवेशात स्वयंसेवक मैदानात हजर होतील. सायंकाळचा मुख्य कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहणार आहे, अशी माहिती देवगिरी प्रांत प्रचारप्रमुख वामनराव देशपांडे यांनी दिली.