शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरगावी गेले अन् स्वाईन फ्लू घेऊन आले !

By admin | Updated: March 2, 2015 00:53 IST

शिरीष शिंदे बीड स्वाईन फ्लू आजार मुळात बाहेर देशातील आहे. त्या ठिकाणच्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने हा मुंबई-पुण्यात पोहोचला. मोठ्या शहरांमध्ये जाऊन

शिरीष शिंदे  बीडस्वाईन फ्लू आजार मुळात बाहेर देशातील आहे. त्या ठिकाणच्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने हा मुंबई-पुण्यात पोहोचला. मोठ्या शहरांमध्ये जाऊन आलेल्या नागरिकांनाच याची लागण होत असून ते उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. आतापर्यंत १३ स्वाईन फ्लू बाधित रुग्णांपैकी सहा ते सात व्यक्तींनी बाहेरगावचा दौरा केला होता, असे समोर आले आहे.जिल्हा रुग्णालयात स्वाईन फ्लू रुग्णांसाठी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला होता. त्यावेळी पहिला स्वाईन फ्लू संशयित रुग्ण झाला होता. तो बाहेर जिल्ह्यात जाऊन आला होता. त्यानंतर पाच ते सहा दिवसांच्या कालावधीत शहंशाहनगर मधील मुलांनी कुटुंंबिय पुणे येथे कामानिमित्त गेले होते. या कुटुंबातील तिघांना फ्लूची लागण झाली असल्याचे ‘नॅशनल इन्सिट्यूट आॅफ व्हायरालॉजी’ (एनआयव्ही) लॅबच्या रिर्पोटमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करुन त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. चार ठिकाणीच औषधी उपलब्धजिल्हा रूग्णालयाकडे स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक गोळ्या व औषधी आहेत. मात्र, आता जिल्हा रूग्णालयाबाहेरूनही रूग्णांना स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक औषधी खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी चार मेडिकल स्टोअर्सची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त रूपेश व्हटकर यांनी दिली. सुभाष रोड येथील दोन, जालना रोडवरील एक तसेच अंबाजोगाई येथील एका मेडिकल स्टोअर्स मध्ये ही औषधी उपलब्ध आहेत. नगर परिषदमध्ये बैठकस्वाईन फ्लूच्या जनजागृतीच्या मोहिमेसाठी शनिवारी नगरपरिषदेत बैठक पार पडली. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राम देशपांडे यांनी स्वाईन फ्लूबाबत काय काळजी घ्यावी? यासंदर्भात मार्गदर्शन केले. गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांची उपस्थिती होती. वैयक्तिक व परिसर स्वच्छता ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.