‘तो’ गोंधळी वकील पुन्हा अवतरला जिल्हा परिषदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:26 IST2017-12-23T00:26:29+5:302017-12-23T00:26:34+5:30
औरंगाबाद : अधिकारी- पदाधिका-यांच्या कार्यालयात काल रात्री अर्वाच्च शिवीगाळ करून गोंधळ घालणारा वकील दुस-या दिवशी पुन्हा सकाळी जिल्हा परिषदेत अवतरला.

‘तो’ गोंधळी वकील पुन्हा अवतरला जिल्हा परिषदेत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अधिकारी- पदाधिका-यांच्या कार्यालयात काल रात्री अर्वाच्च शिवीगाळ करून गोंधळ घालणारा वकील दुस-या दिवशी पुन्हा सकाळी जिल्हा परिषदेत अवतरला. तथापि, प्रशासनाच्या वतीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोेलिसांनी ‘त्या’ गोंधळी वकिलाला अटक केली.
विजय पारखे असे त्या वकिलाचे नाव आहे. पारखे काल गुरुवारी ७ ते ७.३० वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत गेले. त्यांनी उपाध्यक्ष, अध्यक्ष तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनात जाऊन रात्रीच्या वेळी कार्यालये सुरू कशी काय, यावेळी तुम्ही काय करीत आहात, असा जाब विचारत कार्यालयांतील दिवे बंद केले. अचानकपणे सुटाबुटात अवतरलेल्या या वकिलाने तुम्ही यावेळी इथे काय करत आहात, चला निघा, कायद्यानुसार रात्रीच्या वेळी कार्यालय सुरू ठेवता येते का, अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. हा सर्व प्रकार बघून पदाधिकाºयांची काही वेळ भीतीने गाळण उडाली. एकाही पदाधिकारी किंवा सदस्यांनी त्याला हटकण्याची तसदी घेतली नाही. या वकील महाशयाने उपमुख्य (पान २ वर)
क्रांतीचौक पोलिसांना दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर काही वेळात फौजफाट्यासह पोलिसांच्या गाड्या जिल्हा परिषदेत आल्या व त्या वकिलाला घेऊन ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, जि. प. कर्मचारी युनियनचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, सचिव प्रदीप राठोड तसेच जि.प.चे काही कर्मचारी गेले. कापसे यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्या वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला व अटक केली.